Weather Alert | राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचं खेळ सुरू झालेला आहे. दिवसभर कडक ऊन पडतं आणि संध्याकाळी अचानक वाऱ्यांसह पावसांच्या सरी पडतात. हवामान विभागाने सांगितलं की, येत्या 9 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या भागात हलक्याचे मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे.
कोकणात अंदाज काय?
मुंबई, ठाणे, पालघर भागात ढगाळ वातावरण राहणारा असून अधून मधून पावसाच्या सरी येतील. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असे सांगण्यात आलेला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान खात्याने वॉल्ट दिला असून येथे वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. किनारपट्टीवर वारा जोरात वाहणार असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस
हवामान विभागाने पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरामध्ये ढगांचा गडगडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वडिलांचा अंदाज वर्तवला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. या चारी ठिकाणी येलो अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कापूस, सोयाबीन, तुर अशा उभा पिकांची आवश्यक काळजी घ्यावी आणि योग्य ते नियोजन करावे असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या भागात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी ऊन पडल तर दुपारून वातावरण दमट होऊन काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. मात्र जोर कमीच राहिला असं सांगण्यात आलंय. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि पहिल्या नगर या जिल्ह्यात हलक्या सरीचा अंदाज असून दिवसभर आकाश ढगाळ राहील. विदर्भातील अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या भागात हवामान कोरडेच राहणार आहे. तापमान साधारण 23 ते 31 अंश दरम्यान राहील. हवामान खात्याने दिलेला हा हवामान अंदाज शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचा आहे आणि योग्य ते नियोजन करायचे आहे.