Weather Alert | राज्यामध्ये पावसाने थैमान घातलं होतं, यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले, कुठे कोणाच्या घरात पाणी शिरले, कुठे शेतातील पिकच राहिले नाही तर कुठे लोकांना खायला देखील उरले नाहीत. परंतु गेल्या दोन दिवसापासून पावसाने थोडीशी विश्रांती घेतली होती लोकांना वाटला होत हवामान स्थिर होईल. पण एक ऑक्टोबरच्या सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळालं आणि हवामान खात्याने थेट इशाराच दिला. राज्यातील अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. एवढेच नव्हे तर पाच जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने येल्लो अलर्ट दिलेला आहे. Weather Alert
कोकणात तर नेहमीप्रमाणे ढग जमले आहेत. पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारी पट्ट्यात मुसळधार नाही पण मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता आहे. समुद्रकिनाऱ्यावरील गावकऱ्यांनि खास जबाबदारी घ्यावी असे सांगण्यात आल आहे.
तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी पडतील. घाटमात्यांवर तर पाऊस जोरात येण्याची शक्यता आहे. खरीप पिकाचं पिक उभा आहे म्हणून शेतकऱ्यांनी लक्ष ठेवायला हवं, नाहीतर अचानक आलेल्या सरींनी पिकांच नुकसान होऊ शकतं.
मराठवाड्यात परिस्थिती अजून गंभीर आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल. पण नांदेडमध्ये विजांचा कडकडाटात, वादळी वारे यांचा इशारा दिलाय. किती लोकांनी खास करून घराबाहेर फारसा वेळ घालू नये असा सल्ला दिला आहे.
तर उत्तर महाराष्ट्र मध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक इथेही सरींचा अंदाज आहे. घाटमात्यांच्या भागात तर वीज चमकण्याची शक्यता आहे. शेतकरी सध्या चिंतेत आहे, कारण भात, सोयाबीन, कापूस दीपिका आता शेवटच्या टप्प्यात आली आहेत. अचानक पावसाने धक्काच बसू शकतो. विदर्भात दोन चित्र दिसताय. अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा या जिल्ह्यात पावसाची शक्ता आहे.