Weather Alert : राज्यात मे महिन्यातच मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि अशातच पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने राज्यातील 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. यामुळे भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेणे शेतकऱ्यांचे नागरिकांना देखील महत्त्वाचे आहे. या काळामध्ये नुसता पाऊस पडणार नसून मुसळधार पाऊस पडणार आहे यामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते व जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी खालील दिलेली माहिती सविस्तर वाचा. Weather Alert
विदर्भात वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आहे हवामान विभागाकडून विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सावधगिरी बाळगणे खूप आवश्यक आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ होऊ शकते व जीवित हानी देखील होऊ शकते.
तसेच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिलेली आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे. हवामान विभागाकडून सर्वच भागात कोणताही अलर्ट जारी केलेला नाही. परंतु ढगाळ आकाश राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असं हवामान विभागाचे म्हणणं आहे.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर तसेच पुण्यामध्ये ढगाळ आकाश राहणार आहे आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तसेच सांगली सातारा, सोलापूर, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा ढगाळ आकाश रावळ हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तर मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये परभणी, बीड, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर या सर्व जिल्ह्यांमध्ये 30 मे रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.
तर हवामान विभागाने धुळे, नंदुरबार, जळगाव या तिन्ही जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानंतर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क रहावे.
खासकरून विदर्भातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हा हवामान लक्षात घ्यायचा आहे. गर्भातील सर्व जिल्ह्यांना इशारा असल्याने सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. त्याचबरोबर हवामान विभागाची सूचनाचे पालन करावे.
हे पण वाचा | महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट; हवामान विभागाचा इशारा, शेतकऱ्यांनो सावधान !