Friday

14-03-2025 Vol 19

पहावे ते नवलच! भरवर्गात शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबतच केले लग्न; व्हिडिओ होत आहे जोरदार व्हायरल….

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral Video: सध्याच्या सोशल मीडिया युगात कोणतीच अनोखी घटना लोकांपासून लपून राहत नाही. इंटरनेटवर तुम्ही अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहिले असतील जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील नातं खूप घट्ट आणि पवित्र मानले जाते. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या धक्कादायक व्हिडिओमध्ये या नात्याची व्याख्याच बदलली आहे. ज्यामध्ये एक महिला शिक्षिका चालू वर्गात आपल्या विद्यार्थ्यासोबत लग्न गाठ बांधत आहे.

वास्तविक सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पश्चिम बंगालच्या मौलान आझाद इंजीनियरिंग युनिव्हर्सिटी येथील आहे. ज्यामध्ये एक विद्यार्थी आणि शिक्षिका एक अनोखा आणि विचित्र पराक्रम करताना दिसत आहेत. तुम्हाला हे ऐकून पाहून नक्कीच आश्चर्य वाटेल की, या महाविद्यालयातील एका शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्यांशीत लग्न केले आहे. दोघांनी एकमेकांना पुष्पहार घालता आणि शिक्षकांच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांने सिंदूरही लावला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापकाला रजेवर पाठवले आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलेला आहे.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एम्प्लॉईड सायकॉलॉजी विभागाची प्रमुख प्राध्यापिका हातात कंद आणि लाल साडी घालून वर्गात रजनीगंधा आणि गुलाबाची माळ घेऊन पोहोचल्या. त्यांच्यासोबत फर्स्ट इयरचा विद्यार्थी होता. भर वर्गाच्या मध्यभागी विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांना सिंदूर लावला आणि एकमेकांना पुष्पहार घातला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतात युजरने अनेक प्रकारच्या कमेंट या व्हिडिओला केल्या. मात्र, हे केवळ नाटक होते ज्याला प्राध्यापकांनी मॅक वेडिंग असे म्हटले आहे. पायल बॅनर्जी असे या प्राध्यापकाचे नावातून ती अनेक वर्षापासून मानसशास्त्र शिकवत आहे. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक युजरने यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात देखील केली आहे.

लग्नाचा अनोखा व्हिडिओ x वर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि अनेक लोकांच्या कमेंट आल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे अत्यंत लज्जस्पद आणि बेजबाबदार वर्तन आणि शिक्षकांवर कारवाई झाली पाहिजे, तर दुसरे काही उदाहरणे लिहिले आहे वयातील फरक ही त्याची निवड आहे समस्या म्हणजेच जागा म्हणजेच वर्ग. अशा अनेक कमेंट या व्हिडिओला आल्या आहेत. Viral Video

Disclaimer: हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखवण्यासाठी यावर आर्टिकल लिहीत आहोत. या व्हिडिओ बाबत आमचा कोणत्याही प्रकारचा योग्य अयोग्य असा दावा नाही.

Rushi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *