48 तास पावसाचं संकट! या 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; शेतकरी, नागरिक सावध राहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Unseasonal rain news : राज्यभर उकाड्यानं जनजीवन हैराण झालेलं असतानाच आता अवकाळी पावसानं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढचे ४८ तास अत्यंत धोकादायक ठरू शकतात. विशेषतः यवतमाळ, चंद्रपूर आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी गारपीट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा धोका वर्तवण्यात आला आहे.Unseasonal rain news

शेतकऱ्यांसाठी ही बातमी काळजीची ठरतेय. कारण काही ठिकाणी भुईमूग, हरभरा, मका अशा पिकांची काढणी सुरू असतानाच पावसाने उघड्या शेतात नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. बुलडाण्यातील खामगाव तालुक्यात काही भागात मंगळवारी दुपारी २ वाजता अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. शेतकरी नामदेव पाटील सांगतात, “हरभऱ्याचे पोते चाळीवर होते, पावसामुळे ओले झाले. आता ते वाळवायला पुन्हा उन्हाची वाट बघावी लागते.” ही फक्त एक बाब नाही, तर अनेक तालुक्यांत असाच प्रकार सुरू आहे.

मुंबई, पालघर, ठाणे, जळगाव, नांदेड, परभणी, हिंगोली अशा अनेक जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहील आणि हलक्याफुलक्या सरी पडतील. पण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत मात्र पाऊस रौद्ररूप धारण करू शकतो. हवामान विभागाने म्हटलं आहे की, काही ठिकाणी ५० ते ७० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. विजांचा कडकडाट होईल. त्यामुळे कुठेही उघड्यावर फिरणं धोकादायक ठरू शकतं.

सोलापूर जिल्ह्यात तर मंगळवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यांनी अक्षरशः थैमान घातलं. शहरातील अनेक भागांत झाडं पडली, विजपुरवठा खंडित झाला आणि सायंकाळी ५ नंतर रस्त्यावर कुणीच दिसेना इतकी भीतीजनक स्थिती निर्माण झाली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र बागायती शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली. ऊस आणि डाळिंबाच्या फळांवर गारपीट झाल्याने नुकसान झाल्याचं सांगितलं जातंय.

या दरम्यान हवामान विभागानं आणखी एक मोठा अंदाज व्यक्त केला आहे. अंदमानात मान्सून दाखल झाल्यानंतर आता बंगालच्या उपसागरात १६ ते १८ मेदरम्यान कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात हवामान आणखी ढवळून निघण्याची शक्यता आहे.

नाशिक, नगर, पुणे या जिल्ह्यांत देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः नाशिकमध्ये १६ मेपर्यंत सतत ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हे पण वाचा| Monsoon Update; या 12 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार, पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस पडेल IMD ची मोठी अपडेट

Leave a Comment