TVS iQube Electric Scooter 2025 | तुम्हाला तर माहीतच आहे सध्या इलेक्ट्रिकल स्कूटरची मार्केट मध्ये मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. यामध्ये वाढती मागणी आणि येणारी फीचर्स पाहता इलेक्ट्रिक स्कूटर मार्केट गाजवत आहे. ग्राहकांना एकीकडे परडवणारी किंमत हवी असते, तर दुसरीकडे दमदार रेंज आणि भरपूर फीचर्स. अशावेळी TVS कंपनीने आपल्या लोकप्रिय iQube स्कूटरमध्ये आणखी एक दमदार पर्याय ग्राहकांसमोर सादर केलाय. 3.1 किलोवॅट तास क्षमतेच्या नव्या बॅटरी सह येणारी ही स्कूटर आता एका चार्ज मध्ये तब्बल 123 किलोमीटरचा रेंज देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. TVS iQube Electric Scooter 2025
ही नवीन स्कूटर दिल्ली X शोरूम मध्ये फक्त 1,03,727 रुपयांना उपलब्ध आहे. TVS ने या नव्या व्हेरिएंट मध्ये हिल होल्ड अशिष्ट हे नवीन सेफ्टी फीचर्स दिल आहे, जे विशेषता चढावर गाडी थांबवताना खूप उपयोगी ठरतं. याशिवाय, यामध्ये नवीन युजर इंटरफेस आणि Uएक्स डिझाईन देण्यात आला आहे, ज्यामुळे गाडी चालवताना स्क्रीनवरील माहिती अधिक स्पष्टपणे समजते आणि ऑपरेशन अधिक सहज वाटतं.

या नव्या अपडेटनंतर iQube चे एकूण वेरियंटची संख्या आता सहा झाली आहे. Tvs iQube सध्या देशभरातील 1900 पेक्षा अधिक डीलर पॉइंट्स वर उपलब्ध असून आत्तापर्यंत सहा लाखाहून अधिक स्कूटरची विक्री झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
या नव्या विरेन सोबत चार रंगाचे पर्याय देण्यात आलेले आहेत. पर्ल वाईट, टायटॅनियम ग्रे तसेच दोन ड्युअल टोन कॉम्बिनेशन, स्टारलाईट ब्लू विथ बेज आणि कॉपर ब्रांच विथ बेज. म्हणजेच, फक्त परफॉर्मन्स नव्हे तर लुकलाही भरपूर आकर्षक बनवण्यात आले.
मे महिन्यात सादर करण्यात आलेल्या 2025 iQube मध्ये आधीच काही मोठे बदल झाले होते. उदाहरणार्थ, iQube S मध्ये 3.5 kWH ची बॅटरी देण्यात आली असून ती 145 किलोमीटर रेंज देते. तर ST वेरेंत मध्ये याच बॅटरीचा मोठा पर्याय आहे. तो तब्बल 212 किलोमीटरची रेंज देतो. त्याची किंमत आहे 1.59 लाख रुपये (Ex showroom) . त्याचबरोबर स्क्रीन साठी देखील पर्याय आहेत 5 इंचाचा TFT स्क्रीन असलेली व्हेरियंट 1.09 लाखाला मिळाले तर 7 इंच स्क्रीन साठी किंमत 1.17 लाख पर्यंत जाते.
TVS iQube ही सध्या देशात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी OLA, Ather, Bajaj आणि हिरो यासारख्या कंपन्यांच्या स्कूटरसना टक्कर देत आहे. आता या नव्या 3.1kwh व्हेरेंट मुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी एकदम योग्य पर्याय उपलब्ध झाला आहे आणि त्यांच्या किमती अवाक्यात आहेत.