Tur Market Price : राज्यत सध्या तूर काढायला सुरुवात झाली आहे. व काही प्रमाणात तुर बाजारात येण्यास सुरु आहे. बाजारात येताच तुरीचे दरा मध्ये दिसून आली घसरण. 30 डिसेंबर रोजी तुरीला अकोला बाजार समिती व इतर महाराष्ट्र बाजार समितीमध्ये कमाल 9 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळत होता. पण काल 1 जानेवारी 2024 च्या दिवशी तुरीला कमाल 9हजार 300 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. म्हणजे तुरीच्या दारामध्ये 500 रुपयांनी घट झाली आहे.
Tur bazar bhav 1 January 2024 : महाराष्ट्रात इतर बाजार समितीमध्ये तुरीचे बाजार भाव :
अकोला बाजार समितीमध्ये तुरीला कमाल 9 हजार 300 रुपये व सरासरी 8200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.वाशिम जिल्ह्यामध्ये असलेले कारंजा बाजार समितीमध्ये आज तुरीला 9 हजार रुपये व सरासरी 8 हजार 300 रुपये इतका दर मिळाला आहे.
अमरावती बाजार समितीमध्ये तुरीला 9 हजार रुपये ते सरासरी 7500 रुपये प्रति क्विंटर दर मिळाला आहे.
जालना बाजार समितीमध्ये आज तुरीला कमल 8 हजार 800 रुपये ते सरासरी 8 हजार 500 रुपये इतका दर मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यात असलेले दुधनी बाजार समितीमध्ये आज तुरीला 8 हजार रुपये ते 8 हजार 100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
यवतमाळ बाजार समितीमध्ये आज तुरीला 8 हजार 700 रुपये ते 8 हजार 800 रुपये इतका दर मिळाला आहे.
वाशिम बाजार समितीमध्ये आज तुरीला 8 हजार 600 ते सरासरी 8 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
अक्कलकोट बाजार समितीमध्ये आज तुरीला 8 हजार 500 ते 8 हजार 200 रुपये इतका दर मिळाला आहे.
राज्यातील तुरीला सरासरी दर हे 8 हजार 500 ते 7 हजार रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. यावर्षी तुरीच्या उत्पादनामध्ये घट आहे. पावसाची कमतरता असल्यामुळे तुरीच्या शेंगा व्यवस्थित नाहीत. यामुळे यावर्षी तुरीच्या आवक मध्ये घट होण्याची शक्यता आहे. परंतु तुरीचे दर कमी असल्यामुळे सध्या तुरीला मनावा तितका भाव नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत