Success Story | या शेतकऱ्यांनी शिंगाडा फळाची शेती करुन कमवला भरघोस नफा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story | नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की काही शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या ओढा किंवा नदी याच्या बाजूला असते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या रानामध्ये पावसाळ्यात नेहमी पाणी साचून राहत असते.

तर यावर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस हा कमी झाला आहे. यामुळे काही शेतकरी अशा वावरांमध्ये उत्पन्न देखील घेत असतात. पण, अशा अवकाळी पावसामुळे या शेतामध्ये पाणी हे नेहमी साचून राहत असते. अशातच बिहारमधील राज्यातील पुरग्रस्त या भागांमध्ये एका शेतकऱ्याला देखील अशीच अडचण पावसाळ्यामध्ये नेहमी भासत होती.

त्यामुळे त्या शेतकऱ्याने यावर मातं करत या शेतामध्ये शिंगाडा या फळाची लागवड केली. तर या शेतकऱ्याने या फळाच्या लागवडी मधून एका हंगामामध्ये दीड लाख रुपयांचे उत्पन्न कमवले आहेत.

या शिंगाडा फळाबद्दल जाणून घ्या.

शिंगाडा या फळाची मागणी ही उपवासामध्ये फार केली जाते .शिंगाडा या फळाची लागवड ही प्रामुख्याने उष्ण व समतीष्ण अशा प्रदेशाच्या ठिकाणी म्हणजेच, तलाव, शेततळे व भात पिकाप्रमाणे या खचरांच्या शेतामध्ये केली जात असते.

व ज्या शेतकऱ्यांच्या या नैसर्गिक शेततळ्यामध्ये पाणी साचून किंवा अतिपावसामुळे या शेतामध्ये पाणी साचून राहते अशा शेतामध्ये या पिकाची लागवड केली जाते. शिंगाडाच्या फळांमध्ये एक अनेक प्रकारचे आयुर्वेदिक गुणधर्म यामध्ये सामावून असतात. या शिंगाडा फळाची जाडी ही कमीत कमी 2 सेंटीमीटर इतकी असते.

तर या फळाचा गर हा मग प्रकारे असतो. व याची चव ही किंचित गोड असे असते. तर या शिंगाड्याचे कंद व फळांना उपवासामध्ये फारच जास्त प्रमाणावर मागणी असल्याने तेथील पाणथळ शेती असलेल्या शेतकऱ्यांना याचे चांगल्याच प्रकारे उत्पन्न मिळत असते.

या शिंगाडा फळातुन किती उत्पन्न हे मिळते ?

एका शेतकऱ्याच्या माहितीस्तव एका हेक्टर मध्ये व पाणथळ शेतीतून किंवा भारताच्या खाचरा सारख्या जमिनीतून जवळपास 100 क्विंटल शिंगाडा पिकाचे यामधून उत्पन्न मिळत असते. की ज्यामधून नैसर्गिक शेती मधून पावसाळ्याच्या महिन्यामध्ये आपल्याला या पिकापासून निव्वळ दीड लाख रुपये नफा हा कमावता येतो.

व अशा या अतिपावसामुळे आणि पुरग्रस्त भागातील शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जमीन ही पडून राहण्यापेक्षा या शिंगाड्याच्या फळाची शेती करणे अतिउत्तम आहे. असे तेथील शेतकरी माहिती देत असतात.

तर या फळाची लागवड ही कशी केली जाते ?

शेतकरी सांगतात की या शिंगाड्याच्या लागवडीची तयारी हे फेब्रुवारी महिन्यापासूनच केली जात असते. सध्या या पिकाची ही रोपे तयार केली जात असतात. जुन व जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये ती एक मीटर अंतरावर पाणथळ शेतामध्ये लावली जात असते. या पिकाची रोपे तयार करताना व्यवसायिक पद्धतीने याची बियाण्यांद्वारे ही लागवड केली जात असते. व पूर्ण पिकलेली शिंगाड्याची फळं ही एका

भांड्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये उगवण्यासाठी ठेवावे लागते. काही दिवसांनी शिगाड्यांचे बियांना कोम फुटण्यास सुरुवात होते.कोंब फुटलेले हे शिंगाडे वेगळे करून रोपवाटिकेतील पाण्याच्या टाकीमध्ये सोडावे लागतात.

पावसाळ्याच्या सुरुवातीला या शिंगाड्यांच्या रोपांची लागवड ही केली जाते. लागवडी वेळेस या शेतामध्ये जास्तीत जास्त गुडघ्या एवढे पाणी पुरेसे आहे. 1×2 मीटर व 2×3 मीटरच्या अंतरावर या रोपांची लागवड करावी. व या रोपांची वाढ पूर्ण झालेल्या वेलांची बियाणे म्हणून ही वापर करण्यात येतो.

Leave a Comment