SSC-HSC Practical Exam : दहावी बारावीचे पेपर आगदी काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यातच आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने दहावी बारावीच्या परीक्षेबाबत घेतला मोठा निर्णय.
दहावी-बारावीचे पेपर पुढील महिन्यात सुरु होणार आहे. पण आता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने या परीक्षा संदर्भात दिली महत्त्वाची माहिती. दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहे. लेखी परीक्षा अगोदर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण OMR गुणपत्रिकेत पाठवले जात होते. यामध्ये राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने बदल केला आहे. यामध्ये आता हे गुण बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे.
याची माहिती राज्य महामंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी राज्य महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर एक परिपत्रक प्रसिद्ध करून दिली आहे. यामध्ये त्यांनी ऑनलाइन पद्धतीने गुण भरणे बाबतची माहिती दिली आहे.
राज्य शिक्षण महामंडळ तर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येत आहे. आणि आता विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ,तोंडी अंतर्गत मूल्यमापनाचे गुण भरण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय तातडीने लागू करण्यात आला आहे.
यामध्ये आता मेकरा आणि चेकर चा समावेश केलेला आहे. ज्यामुळे आता शाळेचे प्रचार्य किंवा मुख्याध्यापक चेकर ची भूमिका घेणार आहेत. मात्र या नवीन निर्णयामुळे विद्यार्थी गोंधळात आहेत.