Thursday

13-03-2025 Vol 19

दहावी बारावीच्या परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी! कॉफी आढळल्यास परीक्षा केंद्र कायमचे बंद होणार..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC-HSC Exam: महाराष्ट्र शिक्षण महामंडळाने दहावी बारावीच्या परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांची अदलाबदली करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे परीक्षा अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने होण्याची अपेक्षा होती. महाराष्ट्र सरकारने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने फेब्रुवारी 2025 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा बाबत कडक नियम लागू केले आहे. दहावी बारावीच्या परीक्षा दरम्यान कॉफी आढळल्यास परीक्षा केंद्र कायमचे बंद केले जाणार आहे.

दहावी बारावीच्या परीक्षे दरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, कॉफी आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्राच्या मान्यता कायमची रद्द करण्यात येणार आहे. तसेच केंद्रावरील शिक्षक केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांच्या बदल्याबाबतच्या धोरणात काही प्रमाणात सुधारणा करण्यात आली आहे. यामुळे परीक्षेचे गांभीर्य राखले जाईल आणि पारदर्शकता सुनिश्चित केली जाईल. या निर्णयामुळे परीक्षेमध्ये शिस्त आणि पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा आहे.

दहावी बारावीच्या परीक्षा कॉपीयुक्त पार पाडाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यक्रमांतर्गत सर्व केंद्र संचालक आणि प्रवेशकांचे अदलाबदली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र शिक्षक संघटना आणि शिक्षक आमदारांच्या तीव्र विरोधानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक महामंडळाने हा निर्णय बदलण्याचा निर्णय घेतला. आता केवळ 2018 2019 2023 आणि 2023 या परीक्षा दरम्यान कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास केंद्रावरील पर्यवेक्षक व केंद्र संचालकाचे अदलाबदल करण्यात येणार आहे. या नव्या निर्णयामुळे शिक्षण मंडळाने शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन या सुधारणा करण्यात आली. मात्र परीक्षा प्रक्रिये दरम्यान शिस्त आणि पारदर्शकता कायम राहावी यासाठी दुसरा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा सुरू असून त्यांच्या लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहेत. तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा तीन ते वीस फेब्रुवारी पर्यंत पार पडेल. त्याचबरोबर त्यांची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे. दोन्ही परीक्षेचे नियोजन शिक्षक महामंडळाने अंतिम टप्प्यात आणली असून, परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक उपयोजना करण्यात आल्या आहेत. SSC-HSC Exam

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागीय महामंडळ अंतर्गत येणाऱ्या परीक्षा केंद्रासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहेत. 2018 पासूनच्या परीक्षांमध्ये ज्या केंद्रावर कॉफीच्या घटना आढळल्या त्या केंद्रावर नवीन पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक नियुक्त केले जाणार आहे. हा निर्णय परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि शिस्त कायम राखण्यासाठी घेण्यात आला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Rushi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *