Soybean Rate | सोयाबीन पिकाची महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सोयाबीन पिकाचे प्रामुख्याने उत्पादन राज्यातील विदर्भ मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. सोयाबीन पिके महाराष्ट्र मधले नगदी पीक आहे. परंतु बऱ्याच दिवसापासून कापूस सोयाबीन या ठिकाणी शेतकऱ्यांना रडवले आहे. बाजारामध्ये योग्य असे बाजार मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
बऱ्याच दिवसापासून सोयाबीनचे आणि कापसाचे भाव दाबावत होते. त्यामुळे (Soybean Rate) सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील भरून निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा जनक परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु अशातच जागतिक बाजारांमधून एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे व ही अपडेट शेतकऱ्यांना दिलासादायक ठरणार आहे. ती म्हणजे जागतिक बाजारामध्ये सोयाबीन सोयापेंड आणि सोया तेलाच्या भावामध्ये वाढ नमूद करण्यात आली आहे.
हे पण वाचा : गावानुसार मतदान यादी मध्ये नाव चेक करा; नवीन मतदान यादी जाहीर
मिळालेल्या माहितीनुसार जागतिक बाजार मध्ये तब्बल दीड महिन्यानंतर सोयाबीन बाजारामध्ये सुधारणा झालेली दिसून येत आहे सोयाबीनच्या तेलाच्या बाजारभावामध्ये देखील तीन महिन्यांनी विक्रमी सुधारणा झाली आहे.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयातेल मध्ये तीन महिन्याच्या उंची भाऊ पातळीवर पोहोचलेले आहे याचा परिणाम म्हणून आदेशातील प्रक्रिया प्लांट्स मध्ये देखील सोयाबीनचे भाव काहीसे वाढलेले आहेत देशात आज प्रक्रिया प्लांट्स चे भाव वाढलेले दिसून आले.
तसेच जागतिक बाजारामध्ये सोयाबीन सोयाबीन आणि सोयातेलच्या बाजारात सुधारणा झालेली असल्यामुळे देशांतर्गत सोयाबीनचे भाव वाढणार का असा सवाल शेतकऱ्यांमध्ये उपस्थित झाला आहे दरम्यान याच संदर्भामध्ये अभ्यासकांनी महत्वाची माहिती दिली आहे.
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार देशामध्ये सगळ्यांचे भाव लगेच वाढणार नाहीत परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पुढील दीड ते दोन महिन्यांमध्ये आणखी पाच ते सात टक्के भाव वाढणार असल्याची माहिती दिली आहे.
या कारणामुळे बाजारामध्ये भाव वाढीचा परिणाम दिसून येणार आहे. मात्र लगेच भावामध्ये तेजी येण्याची शक्यता नाही असे देखील तज्ञांनी मत व्यक्त केले आहे व काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या घरामध्ये शंभर रुपयापर्यंत वाढवू शकते.
तसेच पुढील येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीन दरामध्ये 100 ते 200 रुपयांनी सुधारणा होण्याची शक्यता आहे. तसेच एकंदरीत सोयाबीनचे दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल च्या आसपास राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.