Soybean market price : महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचे भाव शेतकरी चिंतेत आहे महाराष्ट्र सरकार शासकीय हमीभावन सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावेत अशी मागणी सर्वत्र सुरू आहे. व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी बांधव करत आहेत.
आज गुरुवार रोजी अकोला कृषी बाजार समिती दोनशे रुपयांनी सरासरी सोयाबीन दरामध्ये वाढ झालेली आहे काल बुधवारी या बाजारात कमीत कमी तीन हजार पाचशे रुपये पासून चार हजार सहाशे रुपये इतका भाव होता तर सरासरी चार हजार शंभर रुपये पर्यंत प्रमाणे होते त्या दिवशी सोयाबीनची आवक पाच हजार 778 एवढी झाली होती.
मंगळवारी 17 ऑक्टोबर रोजी कमीत कमी तीन हजार दोनशे ते जास्तीत जास्त चार हजार पाचशे दहा रुपये आणि सरासरी दर चार हजार दोनशे रुपये होता तर 5000 898 क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली होती आज गुरुवार सोयाबीन दरात सुधारणा पाहायला मिळाली आहे कमीत कमी तीन हजार पाचशे पासून ते ४५७५ रुपये पर्यंत असून सरासरी दर दोनशे रुपयांनी अधिक होऊन चार हजार तीनशे रुपये पर्यंत गेले आहेत.
खाजगी बाजारामध्ये सोयाबीन हमीभावापेक्षा कमी भावाने विकला जात आहे आता शेतकऱ्यांकडून हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी सुरू होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे गेल्या 2017 18 मध्ये नाफेड द्वारे सोयाबीनची खरेदी झाली होती यंदा नाफेड कडून खरेदी होणार का याकडे लक्ष लागले आहे.