Sorghum Market Price | राज्य मधील या बाजार समितीमध्ये ज्वारीची मोठ्या प्रमाणात झालेली आहे. जवळपास काल दिवसभरामध्ये वीस हजार क्विंटल अधिक आवक झालेली होती. तसेच हायब्रीड ज्वारीची सर्वाधिक 4000 कुंटल ची आवक झालेली आहे. त्या खालोखाल पांढरी साळू आणि लोकल ज्वारीची आवक झालेली आहे. तसेच आज ज्वारीला सरासरी 2010 पासून ते चार हजार रुपये पर्यंत इतका बाजार भाव मिळाला आहे.
पणन महामंडळाच्या मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण दादर हायब्रीड लोकल महा दांडी शाळू आणि पांढरी ज्वारीची आवक झालेली आहे. तसेच सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 1925 रुपये ते 3700 इतका दर मिळाला आहे. तसेच दादर ज्वारीला सरासरी 2450 ते 3150 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. तसेच हायब्रीड ज्वारीला सरासरी दोन हजार रुपये पासून ते 3240 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
तसे आज मुंबई बाजार समितीमध्ये लोकल ज्वारीला सरासरी चार हजार दोनशे रुपये तर पुणे बाजार समितीमध्ये मालदांडी ज्वारीला 4400 इतका दर मिळाला आहे. तर तडकळस मार्केटला नंबर वन ज्वारीला सरासर 2400 रुपये इतका दर मिळाला आहे पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2165 ते 3950 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.
तसेच पैठण बाजार समितीमध्ये रब्बी ज्वारीला सरासरी 2200 रुपये इतका दर मिळाला आहे. तर शाळू ज्वारीला सरासरी 2116 ते 4250 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. तसेच कल्याण बाजार समितीमध्ये वसंत ज्वारीला सरासरी तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.