SOLAR PUMP : महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाने वीज योजनेचा प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याची योजना जाहीर केलेली आहे या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी महावितरणाकडे वीज कनेक्शन साठी अर्ज करून कोटेशन भरले नाही व त्यांची वीज जोडणी करून देण्यात आलेली नाही अशा शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येणार आहे.
सोलर पंप हे पर्यावरणपूरक आणि स्वस्त असतात त्यामुळे शेतकऱ्यांना लागणारे वीजबलाची बचत होईल व त्यांचे उत्पन्न वाढणार आहे या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीत मे अधिक मेहनत करण्यास प्रोत्साहन मिळणे आणि त्यांचे जीवनमान उंचावेल
असा घ्या योजनेचा लाभ
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महावितरणाच्या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या ग्राहक क्रमांक आणि आधार कार्ड ची माहिती लागेल अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचे नाव पत्ता जमिनीची माहिती आणि इतर आवश्यक माहिती भरण्यासाठी आवश्यकता असेल, व सोलर पंप बसण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही पैसे खर्च करण्याची आवश्यकता लागणार नाही या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे पाच लाख शेतकऱ्यांना होणार आहे.