Shravan Bal Yojana : समाजातील या व्यक्तींचे वय 65 किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर त्यांच्यासाठी श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना आर्थिक आधार देणारी ठरेल.
महाराष्ट्र राज्य हे कल्याणकारी राज्याचे उत्तम उदाहरणं असून राज्य सरकारकडून समाजातील सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांसाठी अनेक योजना राबवण्यात येत असतात.
समाजातील गरजू व आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि निराधार वृद्ध लोकांसाठी राज्य सरकारकडून श्रावण बाळ ही सेवानिवृत्त योजना राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत 65 वर्षे किंवा त्यावरील वृद्ध व्यक्तीला दरमहा 1500 रुपयांची मदत केली जाते.
आर्थिक व दुर्बल असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना ही योजना मदत शहर ठरते. या योजनेचा नेमका उद्देश काय आहे. या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, आणि कसा करायचा .तसेच या योजनेसाठी काय कागदपत्र लागतील याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आपण पाहूया.
श्रावण बाळ योजनेचा उद्देश
समाजातील दुर्बळ घटकांना अर्थ सहाय्य व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धपकाळात आर्थिक साह्य करणे, जेणेकरून त्यांना आधार मिळेल. व या योजनेच्या माध्यमातून निराधार वृद्ध लोकांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे हा उपदेश आहे.
श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी
65 वर्षावरील निराधार वृद्ध
आवश्यक माहिती
- विहित नमुन्यातील अर्ज
वयाचा दाखला , किमान 65 वर्ष ,
लाभार्थी हा किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे - या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड,
- रेशन कार्ड,
- निवडणूक ओळखपत्र,
- बँक पासबुक झेरॉक्स,
- रहिवासी दाखला,
- अर्जाचा फोटो,
काय लाभ मिळेल?
अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा — 1500/ लाभ
अर्ज कुठे करायचा