मागेल त्याला कृषी पंप योजनेतील वेंडरची निवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Saur Krushi Pump Yojana: केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती कार्यासाठी मदत मिळावी या उद्देशाने ह्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. सरकारने राबवलेल्या योजनेचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होतो. अशाच योजनेपैकी एक योजना म्हणजे मागील त्याला कृषी सौर पंप योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी सोलार कृषी पंप देण्यात येतो.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना अर्ज केल्यानंतर वेंडर कशे निवडावे हे माहीत नसते. शेतकऱ्यांनी मागील त्याला कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज केल्यानंतर वेंडर निवडण्याबाबत सविस्तर माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत. Saur Krushi Pump Yojana

हे पण वाचा | हैरान करणारी आकडेवारी; लाडकी बहीण योजनेतून एवढ्या महिला अपात्र? पहा सविस्तर..

वेंडर कसे निवडावे?

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे वेंडर निवडण्याची प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला महावितरणाच्या अधिकृत पोर्टल ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर पोर्टलमध्ये लाभार्थी सुविधा पर्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर अर्ज क्रमांक किंवा एम टी आय डी, एम एस आय डी, एम के आयडी वापरून तुमचा अर्ज तपासावा. त्यानंतर अर्जाची संपूर्ण माहिती आणि पेमेंट पूर्ण झाले का नाही हे तपासावे. त्यानंतर तुम्हाला assign vendor हा पर्याय दिसेल. त्यानंतर तुम्ही निवडीसाठी उपलब्ध यादी पाहू शकता. या यादीमधून तुमच्या जिल्ह्यातील उपलब्ध असलेले वेंडर तुम्ही निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला मोबाईलवर एक ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी टाका आणि सबमिट करा. वेंडर ने तुमच्या जिल्ह्यात केलेल्या कामाची माहिती देखील इथे उपलब्ध असेल. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे वेंडर निवड निश्चित होईल अशा प्रकारे तुम्ही तुमचे वेंडर निवडू शकता.

हे पण वाचा | लडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांनी दिली मोठी अपडेट! या महिलांचे टेन्शन वाढणार?

सौर कृषी पंप योजनेचे उद्दिष्टे

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील सिंचनावर संपूर्ण हक्क मिळून देणारी योजना ज्यामुळे शेती अधिक सोपी व प्रभावी बनते. फक्त दहा टक्के खर्चात संपूर्ण सौर पंप शेतकऱ्यांना मिळत आहे. एससी एसटी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत विशेष पाच टक्के सवलत दिली जात. उर्वरित खर्च केंद्र आणि राज्य सरकारच् वतीने केला जाणार आहे. शेताच्या क्षेत्रफळानुसार तीन एचपी ते 7.5 एचपी दरम्यानचे स्वर पंप या योजनेअंतर्गत उपलब्ध आहेत. या सौर पंपांना पाच वर्षासाठी दुरुस्ती सेवा आणि विमा संरक्षण देखील दिले जाते. या योजनेअंतर्गत सौर पंप मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना वीज बिल आणि वीज कपातीचे चिंता करण्याची गरज भासणार नाही. सिंचनासाठी दिवसा अखंडित वीस पुरवठ्याची हमी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळत आहे जेणेकरून शेतीच्या कामांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होत नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment