RBI News | खातेधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. प्रसार माध्यमांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयने महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील समर्थ सहकारी बँकेवर मोठी कारवाई केलेली आहे. रिझर्व बँकेने थेट सहा महिन्यांसाठी बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध लादले आहेत. म्हणजे आता नवीन कर्ज देता येणार ना नवीन ठेवी घेता येणार, आणि सगळ्यात मोठे म्हणजे खातेदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता ही येणार नाहीत. हा निर्णय समोर येताच सोलापुरात ठेवीदारांमध्ये अक्षरशः गोंधळ उडालेला आहे. RBI News
बँकेच्या बाहेर आज सकाळपासूनच लोकांची तुफान गर्दी पाहायला मिळत होती. काहींच्या चेहऱ्यावरती चिंता, काहींच्या डोळ्यात राग, तर काहींनी काय कराव हेच कळत नव्हत. पेन्शनवर जगणाऱ्या निवृत्त लोकांचा सर्वात जास्त भडीमार झालेला दिसतोय. अनेक नागरिकांनी निवृत्त पैसे या बँकेत टाकले होते जेव्हा घर भाडे आणि खर्च पाठवायला गेले तर वेळेवरच होत नाही सगळं थांबून गेल आहे.
या सर्व पार्श्वभूमी वरती बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी स्पष्टीकरण दिल आहे. ते म्हणाले RBI ने अचानक निर्बंध लादले. आमचे आर्थिक स्थिती ठीक असूनही हे पाऊल उचलले गेले. बँकेकडे सध्या 70 ते 80 कोटींच्या ठेवी आहेत. गेल्या दोन महिन्यात बँकेने लक्षणीय प्रगती केली आहे. शेअर कॅपिटल दुप्पट झालाय. तर लिक्विडिटी 60 कोटी वाढली आहे. तरीही अचानक कारवाही करण्यात आली आहे, हे आम्हाला कळलंच नाही.
अत्रे पुढे म्हणाले, आम्ही आरबीआय सोबत संवाद साधत आहोत. वैद्यकीय किंवा अत्यावश्यक सेवांसाठी खातेदारांना पैसे काढण्याची परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. दोन दिवसात उत्तर येईल अशी अपेक्षा आहे. काही गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू आहे, आणि जवळपास दीडशे कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे.
सध्या मात्र समर्थ बँक समोरचा रस्ता लोकांनी गच्च भरलाय. लोकांचे एकच प्रश्न पडला आहे आमचे पैसे सुरक्षित आहेत का? आणि या प्रश्नाचे उत्तर अजून कोणाकडेच नाही. सोलापुरातील ही घटना आता महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरले आहे.
हे पण वाचा | सर्वात मोठी बातमी! आता शेतकऱ्यांनाही भरावा लागणार आयकर? आरबीआय समितीच्या सदस्यांची माहिती