Friday

14-03-2025 Vol 19

Ration Card Update: रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू, पहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Food Supply Department: रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी, मित्रांनो तुम्ही रेशन कार्ड चा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. तुम्ही या अगोदर तुमच्या स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येत असलेले धान्य या महिन्यात न घेतल्यास ते धान्य तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये दिले जात होते.

पण आता सरकारकडून हा नियम बंद केला आहे. म्हणजे आता तुम्ही ज्या महिन्याचे धान्य त्याच महिन्यात घेतले पाहिजे अन्यथा तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये धन्य मिळणार नाही. असा नवीन नियम अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून राबविण्यात आला आहे. यामुळे उर्वरित अन्नधान्याचा होणारा काळाबाजार रोखणे शक्य होणार आहे.

राशन दुकानदारासाठी सूचना :

अन्न नागरी पुरवठा विभागाकडून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना काही महत्त्वाचे सूचना परिपत्रकाद्वारे पाठवण्यात आलेले आहे. आपण पाहतो की शिधापत्रिका धारकांना प्रतिव्यक्ती दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ देण्यात येत आहे. मात्र एकाच वेळी लाभार्थी धन्य घेऊन जात नाही. ज्या कारणाने लाभार्थ्यांना पुढील महिन्यात सात दिवसाच्या आत मध्ये मागील महिन्याचे धान्य मिळत होते. अशी परवानगी दुकानदारांना सरकारने दिली होती.

परंतु या कारणामुळे शिल्लक अन्य धान्याचा साठा व तसेच अतिरिक्त धान्याचा साठा याची बेरीज करण्याची काम यापूर्वी रेशन विक्रेत्यांना करावे लागत होते. या कारणाने याचा गैरफायदा घेऊन यातून संबंधित स्वस्त धान्य दुकानदार काळाबाजार करीत होते . शिल्लक धान्याची विक्री करणे बंद कारक असल्यामुळे त्या शिल्लक धान्याचा सर्व हिशोब तालुक्याचे किंवा शहराचे अन्नधान्य वितरक अधिकाऱ्यासह जिल्ह्याच्या पुरवठा अधिकाऱ्याला द्यावे लागत होते . यातून असे स्पष्ट झाले की या नियमामुळे अडचणी निर्माण होत आहेत. Food Supply Department

जाणून घ्यायला दिसते रे बैठकीमधील चर्चा :

ही नवीन नियम लागू करण्यापूर्वी राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली होती. या राज्यस्तरी बैठकीमध्ये स्वस्त धान्य वितरणातील त्रुटी बाबत चर्चा करण्यात आली आहे. चालू महिन्यात लाभार्थ्यांची धान्य घेण्याचे राहिले असेल ते धान्य घेण्यासाठी पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत मुभा देण्याचे ऐवजी त्याच महिन्यात धान्य घेण्यासाठी सक्ती करण्यात यावी. व सरकारकडून आता तेवढ्याच प्रमाणामध्ये धान्याचा कोठा स्वस्त दुकानदारांना देण्यात येणार आहे. ज्या कारणाने राज्यातील धान्याचा होणारा काळाबाजार रोखता येणार आहे.

हे पण वाचा:-

💁‍♂️👇
रेशन कार्ड मध्ये नाव वाढवणे/कमी करणे, नवीन रेशन कार्ड कसे काढायचे? पहा रेशन कार्ड बद्दल सर्व माहिती

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Krushna

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *