रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करायचे आहे; जाणून घ्या सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card New Updates: भारतातील राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आधार कार्ड हे अतिशय आवश्यक आहे. नागरिक म्हणून आपल्या नागरिकत्वाचा तो सर्वात मोठा पुरावा आहे. आधार कार्ड दाखवल्याशिवाय लोकांना रेशन कार्ड वर मिळणारे धान्य, योजना व सुविधा मिळत नाहीत. कारण बनावट रेशन कार्ड तयार करून त्याद्वारे शिधा किंवा सुविधा घेण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे सर्व शिधापत्रिकाधारकांना आधार कार्डशी लिंक करणे हा आहे. आधार कार्ड रेशन कार्ड सोबत कसे लिंक करायचे हे आपण आज जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मिळणार 9,000 रुपये; नेमका काय आहे निर्णय?

रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक कसे करावे?

सर्वप्रथम public distribution system चहा अधिकृत वेबसाईटवर जा. त्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल. तिथे आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक करण्याचा पर्याय दिला आहे त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून रेशन कार्ड सोबत लिंक करता येईल. आधार नंबर टाकल्यानंतर इतर सर्व तपशील भरावा लागेल. आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला एक ओटीपी प्राप्त होईल.

ओटीपी तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर येईल. तो ओटीपी तुम्हाला न चुकता टाकायचा आहे. ओटीपी आल्यानंतर तुमची ओळख नक्की केली जाईल त्यानंतर तुमचे आधार आणि रेशन कार्ड एकमेकांशी जोडले गेल्याचा मेसेज मिळेल. त्यानंतर आधार आणि रेशन कार्ड एकमेकांशी जोडले जाईल. Ration Card New Updates

हे पण वाचा | लाडक्या शेतकरी बहिणींची चिंता वाढली! राज्यातील 19 लाख शेतकरी महिला योजनेतून अपात्र?

आधार लिंक करण्यासाठी काय महत्त्वाचे?

आधार कार्ड आणि रेशन कार्ड एकमेकांशी लिंक करण्या अगोदर हा मुद्दा महत्त्वाचा असतो की तुमचा रेशन कार्ड वर कुटुंबातील सर्व सदस्याचे नाव असले पाहिजे. तसेच रेशन कार्ड वर ज्याची नावे आहेत त्या सगळ्यांनी आधार कार्ड रेशन सोबत लिंक करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी वरील दिलेली माहिती फॉलो करायची आहे. याशिवाय आधार वरचे तपशील चुकले आहेत का हे देखील तपासणी आवश्यक आहे. आधार कार्ड वर स्पेलिंग चूक झाली असेल तर यूआयडीएआय च्या वेबसाईटवर जाऊन मोफत बदलता येते. ही सेवा 14 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.

हे पण वाचा | फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणींसाठी आली मोठी अपडेट समोर..

रेशन कार्ड ला आधार कार्ड का लिंक करावे?

आधार आणि रेशन कार्ड एकमेकांशी लिंक करणे मागे कारण काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जर तुम्ही सरकारने दिलेल्या वेळेत आधार रेशन सोबत लिंक केले नाही तर तुम्हाला सरकारकडून रेशनवर दिलेल्या सर्व योजना चा लाभ घेता येणार नाही. यामध्ये मोफत रेशन सोबत अनेक दुसऱ्या देखील योजना आहेत. त्याचबरोबर तुमच्या नावावर बनावट ओळखपत्र तयार करून कुणीही लाभ घेऊ शकत नाही. या प्रक्रियेनंतर फसवणूक होण्याची शक्यता जवळपास संपूनच जाते. त्यामुळे आधार आणि रेशन कार्ड एकमेकांशी जोडणे आवश्यक आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment