Ration Card New Updates: नमस्कार मित्रांनो, शिधापत्रिका धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी एके वर्षी पडताळणी पूर्ण न केल्यास संबंधित धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही. म्हणजे त्या नागरिकांना रेशन मिळणे बंद होणार आहे. असे पुरवठा विभागाकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे.
शिधापत्रिकेची लाभार्थी यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा
केंद्र सरकारने शिधापत्रिकेवर वितरित केले जाणारे धान्य वितरणाची लाभार्थी माहिती अद्यावत करण्यासाठी ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया मागील महिन्यापासून पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे मागे पडलेले हे काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना स्वस्त धान्य दुकानदारांना करण्यात आले आहेत.
शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई -केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्या नागरिकांना मोफत राशन योजनेचा लाभ मिळणार नाही असे पुरवठा विभागाने स्पष्ट सांगितले आहे. Ration Card New Updates
Tata ची नवीन मॉडेल 5 सीटर इलेक्ट्रिक कार हाय-टेक फीचर्ससह लॉन्च, शोरूम किंमत येथून पहा
एप्रिल 2024 च्या पत्राद्वारे केंद्र सरकारने पुरवठा विभागाच्या तहसील स्तरावरील क्षेत्रय कार्यालयात कुटुंबानुसार शिदेपत्रिकेतील लाभार्थ्यांची ई -केवायसी पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. मी अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी असे सांगण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे हे काम मागे पडले होते.
आता पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सर्व तालुक्यातील पुरवठा निरीक्षकांना ई -केवायसी संदर्भात नव्याने निर्देश देण्यात आले आहेत. केवायसी पडताळणीची मोहीम तातडीने पूर्ण करावी त्या बाबतीत अहवाल लवकरात लवकर शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावा असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.
प्रधानमंत्रीच्या शपथविधी आधीच LPG गॅस सिलेंडरच्या दारात मोठी घसरण! जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन किमती
ई -केवायसी करण्या मागचा उद्देश
ई -केवायसी अपडेट करण्यामागे धान्य वितरण पारदर्शकता आणणे हा एकमेव उद्देश आहे. अनेक कुटुंबामध्ये मयत लाभार्थ्यांचा नावावर अद्याप देखील धान्य दिले जात आहे. संबंधित कुटुंबाकडून याबाबतची माहिती पुरवठा विभागाला दिली जात नाही. नव्या मोहिमेमध्ये प्रत्येक तालुक्यातील मयत लाभार्थी वगळले जातील व धान्य वितरणाचा लाभ ही तर वंचित लाभार्थ्यांना मिळेल.
शिधापत्रिकेत नाव असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या क्षेत्रातील संबंधित स्वस्त धान्य दुकानात जाऊन तिथे उपलब्ध करून दिलेली ई पॉस डिजिटल यंत्रणांमध्ये आधार क्रमांक शेडिंग करून घ्यायचा आहे. अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असून ई केवायसी पूर्ण झाल्यावर येत्या काळात लाभार्थ्यांच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे. स्थलांतरित कुटुंबांना देखील हे वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई -केवायसी पडताळणी करता येणार आहे.
पीएमची शपथ घेण्या अगोदरच सोन्याच्या दरात मोठी घसरण! तुमच्या शहरातील नवीनतम किंमत जाणून घ्या
गाव पातळीवर असलेल्या स्वस्त राशन दुकानांमध्ये बसवण्यात आलेले ई पॉस मशीन 2g/3g असल्याने अन्नधान्य वितरणाचे व्यवहार करताना वेळोवेळी अडचणी येत होत्या. मात्र आता प्रत्येक दुकानात M/S Oasys नवीन 4G तंत्रज्ञान असलेली ही ई पॉस मशीन बसवण्यासाठी कार्यवाही पूर्ण झाली आहे. Ration Card New Updates
स्वस्त धान्य दुकानात असलेल्या 4G ई-पॉस मशीनद्वारे शिधापत्रिकाधारकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांची केवायसी करून घ्यावी. केवळ आधार कार्ड क्रमांक टाकून ही प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांचे रेशन कायमचं बंद होऊ शकते. स्वस्त धान्य दुकानात केवायसी साठी निशुल्क प्रक्रिया आहे. भविष्यात हीच प्रक्रिया ई सेवा केंद्र किंवा खाजगी ठिकाणी करावी लागल्यास त्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात.
पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याचे 2000 रुपये जून महिन्याच्या याच तारखेला होणार जमा!
15 जून नंतर रेशन वाटप सुरू होईल तोपर्यंत केवायसी पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी रेशन घेण्यासाठी जाताना रेशन दुकानात आधार कार्ड घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. 15 जून नंतर रेशन वाटप सुरू झाल्यावर केवायसी पडताळणीसाठी वेळ लागू शकतो. एकाच वेळी रेशन वाटप आणि केवायसी पडताळणी करणे शक्य होणार नाही. गेर सोय टाळण्यासाठी 15 जून पूर्वीच शिधापत्रिकाधारकांनी आपल्या कुटुंबातील शिधापत्रिकेत नावे समाविष्ट असलेल्या सदस्यांची केवायसी पडताळणी करून घेणे आवश्यक आहे.
1 thought on “रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी, 15 जून पर्यंत हे काम न केल्यास शिधापत्रिकेवरील धान्य होणार बंद..!”