Ration Card KYC Update: रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेशन कार्ड चालू ठेवण्यासाठी आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत ई केवायसी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण नाही केली तर तुम्हाला रेशन कार्ड वर मिळणाऱ्या सर्व योजना व मोफत रेशन मिळणार नाही. शिवाय तुमचे रेशन कार्ड ऍक्टिव्ह देखील राहणार नाही. त्यामुळे तुम्ही अजूनही केवायसी केली नसेल तर त्वरित रेशन दुकानावर जाऊन तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
ई केवायसी मुळे रेशन कार्ड धारकांची माहिती सरकारला प्राप्त होणार आहे. तसेच रेशन कार्ड योजनेत कोणत्याही प्रकारचे फसवणूक किंवा गैरव्यवहार टाळण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. रेशन कार्ड वर कुटुंबातील ज्या सदस्यांची नावे आहेत त्या सर्व सदस्यांना ई केवायसी करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मृत व्यक्तीचे राशन देखील अनेक लोक घेत आहेत. अशा घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. 28 फेब्रुवारी पर्यंत ज्या सदस्यांनी ई केवायसी प्रक्रिया केली आहे त्यांनाच रेशन दिल्या जाणार आहे.
हे पण वाचा | पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची माहिती! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये…
ई केवायसी कशी करावी?
ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप फॉलो कराव्या लागतील.
घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने केवायस करण्यासाठी रेशन कार्ड च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी बायोमेट्रिक पद्धतीने तुम्ही तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जवळच्या रेशन दुकानात जाऊन तुमची ई-केवायसी करू शकतात. वन नेशन वन राशन योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही रेशन दुकानात तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. Ration Card KYC Update
हे पण वाचा | फार्मर आयडी शेतकऱ्यांसाठी ठरणार मोठ्या फायद्याची; याद्वारे मिळणारी 5 महत्त्वाचे मोफत फायदे
आवश्यक कागदपत्रे
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- ओळखपत्र
हे पण वाचा | महिलांना लखपती करत आहेत ‘या’ सरकारी योजना; तुमच्यासाठी कोणती योजना फायद्याची?
ई केवायसी चा फायदा काय?
या प्रक्रियेमुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे फसवणूक रोखले जाणार आहे. रेशन कार्डचा वापर फक्त योग्य व्यक्तीच घेत आहे की नाही हे निश्चित होणार आहे. माहितीची अचूकता रेशन कार्ड धारकांची माहिती अचूक होणार आहे. या सर्व प्रश्नावर आता केवायसी करण्याची ऑनलाईन प्रक्रिया अगदी सोपी आणि जलद आहे. या प्रक्रियेमुळे पारदर्शकता निर्माण होणार आहे. देशातील सर्व रेशन कार्डधारकांना 28 फेब्रुवारी पर्यंत एका वर्षी करून घेणे आवश्यक आहे. या योजनेची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही अंतिम तारीख आहे. या तारखेपर्यंत इ केवायसी न केल्यास रेशन कार्ड कायमचे बंद होऊ शकते. त्यामुळे शासनाने ई केवायसी प्रक्रिया करून घ्या असे आव्हान केले आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा