Rain Alert In Maharashtra: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात आणखीन चार-पाच दिवस जोरदार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
राज्यात पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. आज पुण्याचा घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पुणे शहरातील नागरिकांना कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. पुणे शहराला येलो अलर्ट देण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर जिल्ह्यात देखील अलर्ट जारी करण्यात आले आहे.
कोकण मध्ये 2 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्याचबरोबर विदर्भात 29 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भात उद्या पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येल्लो अलर्ट जरी करण्यात आले आहे.
पुणे शहराचा हवामान अंदाज
पुणे शहराच्या परिसरात दोन दिवसाच्या आरामानंतर पावसाने पुन्हा जोर धरला आहे. आज पहाटेच्या सुमारास काही भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. आज पुण्यासह पाठवता परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज पुणे शहराला येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. आज हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई सह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, पुणे, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांना 27 जुलै ते 2 ऑगस्ट पर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. या जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. Rain Alert In Maharashtra
राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मुंबई सह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांना देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात देखील आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांनी स्वतःची खबरदारी बाळगावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
धरणाचा पाणीसाठा वाढला
मागील 24 तासांमध्ये धरण साखळीत 1.45 टीएमसी पाण्याची भर झाली आहे. खडकवासच्या धरणात 52 टक्के पाणी साठले आहे. पाण्याची आवक वाढल्याने खडकवासला पुन्हा शंभर टक्के पाणी येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पानशेत आणि वारास गाव धरण क्षेत्रातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील डोंगरी पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची वाढ झाली आहे.
5 thoughts on “महाराष्ट्रात आणखीन 4-5 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस; या जिल्ह्यांना अलर्ट जारी, पहा हवामान अंदाज”