अवकाळी पाऊस अजून गेलेला नाही, राज्यात ‘या’ तारखेपर्यंत बरसणार जोराचा पाऊस, पंजाबरावांचा नवीन अंदाजकाय काय म्हणतोय?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjab Duck Weather Forecast : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसाने आणि गारपिटल शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळवले आहे. या अवकाळी पावसाने हातात तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा हिरावून घेतलेला आहे.

या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, केळी आणि कांदा समवेधी तर शेती पिकांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात तर गारपीट झाली आहे. म्हणून जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

दरम्यान कालपासून अवकाळी पावसाचे वातावरण हळूहळू निवडण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी झाला आहे. पण अजूनही महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट कायम आहे.

हवामान खात्याने आज महाराष्ट्रातील मध्य भागामध्ये म्हणजेच महाराष्ट्रात असे मराठवाडा व विदर्भ विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे.

सोबत आत्ता ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी देखील राज्यातील हवामानाबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी माहिती दिलेली आहे. पंजाबराव यांनी राज्यातील दोन डिसेंबर पर्यंत कसे हवा राहणार याबाबत माहिती दिलेली आहे. ती माहिती आपण जाणून घेणार आहोत.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अजूनही अवकाळी पावसाचे वातावरण पूर्णपणे गेलेले नाही. राज्यात आणखी दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले की राज्यात आता दोन सप्टेंबर पर्यंत अवकाळी पाऊस सुरूच राहणार आहे.

काही भागांमध्ये एक सप्टेंबर पर्यंत काही ठिकाणी दोन सप्टेंबर पर्यंत अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी दिला आहे. या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस साजरी लावणारा असा अंदाज आहे.

राज्यातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, बार्शी, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या कालावधीत पडणारा पावसाळा मात्र सर्व दूर पडणार नाही. या कालावधीत भाग बदलत पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

तसेच या कालावधीत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना विशेष सावधान यांचा सल्ला त्यांनी दिला आहे.

Leave a Comment