Punjab Dakh New Weather Forecast : नागरिकांसह राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारतीय हवामान विभाग आणि 28 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्र मध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज उत्तर महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.
तसेच नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. तर काही ठिकाणी तर गारपीट होण्याची शक्यता, वर्तवण्यात आलेली आहे. उर्वरित महाराष्ट्र विचार केला तर राज्यातील मराठवाडा विभागातील दोन जिल्हे वगळता आणि विदर्भ विभागातील दोन जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अवकाळी पाऊस पडणारा आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.
म्हणजेच आज राज्यातील जवळपास 31 जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून, या अशा उद्या आणि परवा देखील राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तनात आलेली आहे. तसेच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी देखील एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र मध्ये सध्या अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यात 27 नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पाऊस हजेरी लावून येणार आहे. म्हणजेच राज्यात आणि उद्या अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र तसेच कोकण विभागामध्ये अवकाळी पाऊस होईल, असे त्यांनी सांगितलेले आहे. मात्र या कालावधीमध्ये पडणारा पाऊस हा सर्व दूर पडणार नाही. तर तुरळक ठिकाणी पडण्याची शक्यता आहे.
एखाद्या जिल्ह्यात काही भागात पाऊस पडेल तर काही भागांमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. पण या कालावधीत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेत पिकांची आणि पशुधनांची विशेष काळजी घ्यावी अशी आव्हान जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी केलेले आहे.
यामुळे आता हवामान खात्याचा आणि पंजाबराव डक हवामान अंदाज खरा ठरतो की नाही हे पाहणे गरजेचे आहे. तर महाराष्ट्रात खरंच अवकाळी पाऊस पडणार का? या कडे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.