Post Office Scheme: जर तुम्ही देखील भविष्यासाठी तुमच्याकडील पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करून चांगला नफा मिळवण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसचा हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. पोस्ट ऑफिस मध्ये केलेली गुंतवणूक ही संपूर्णपणे सुरक्षित आणि यातून ग्राहकांना जबरदस्त परतावा देखील मिळतो. आजच्या परिस्थितीत आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून तुम्हाला फक्त व्याजातून 20 लाख रुपयांचा नफा मिळू शकतो. ही बातमी ऐकल्यानंतर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही मात्र पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजनेने हे सिद्ध करून दाखवले आहे.
पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेला टीडी योजना किंवा एफडी योजना म्हणून देखील ओळखले जाते. या योजनेचे स्वरूप बँकेच्या एफडी योजनेप्रमाणे आहे या योजनेला पोस्ट ऑफिस ची एफडी योजना म्हणून देखील ओळखले जाते. दरम्यान आज आपण या पोस्ट मधून पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेतून कशा पद्धतीने वीस लाख रुपयांचे व्याज मिळू शकतो याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
काय आहे पोस्ट ऑफिस ची टाईम डिपॉझिट योजना?
पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूकदारांना एका वर्षासाठी, तीन आणि पाच वर्षासाठी गुंतवणूक करता येते. एका वर्षाच्या टीडी योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 6.9% व्याजदर मिळतो. दोन वर्षासाठी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना सात टक्के व्याजदर मिळतो. तीन वर्षासाठी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.10% व्याजदर मिळतो आणि पाच वर्षासाठी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदरास 7.50% व्याजदर दिला जातो.
या योजनेची खासियत म्हणजे पोस्ट ऑफिसच्या या टीडी योजनेला एक्सटेंड सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे जर तुम्ही पाच वर्षाची एफडी योजनेत गुंतवणूक केली तर तुमच्या मॅच्युरिटीचा काळ पूर्ण झाल्यानंतर देखील तुम्ही ही योजना आणखीन पाच वर्षासाठी पुढे एक्सटेंड करू शकता. Post Office Scheme
वीस लाख कसे मिळणार?
तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 20 लाखाचे व्याजदर मिळवायचे असेल तर तुम्हाला पाच वर्षाच्या टीडी योजनेत दहा लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. पाच वर्षाच्या टीडी योजनेत एवढी रक्कम गुंतवल्यानंतर तुम्हाला या योजनेला दोनदा मुदतवाढ द्यावी लागणार आहे. तुम्हाला या योजनेत 10 लाख रुपये गुंतवून पंधरा वरसाठी गुंतवायचे आहेत. जर तुम्ही पाच वर्षाच्या टीडी योजनेत दहा लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 7.5% व्याजदराने एकूण रकमेवर व्याज 4 लाख 49 हजार 948 रुपये एवढे मिळते. अशाप्रकारे एकूण रक्कम 14 लाख 49 हजार 948 रुपये एवढी होते.
अशाच प्रकारे तुम्ही ही योजना पाच वर्षासाठी आणखी वाढवली तर तुम्हाला फक्त अकरा लाख 2349 रुपये एवढे व्याज मिळेल. आणि दहा वर्षानंतर तुमची एकूण रक्कम 21 लाख 2,349 रुपये एवढी होईल. मात्र जर तुम्हाला फक्त 20 लाख रुपयांच व्याज हवे असेल तर तुम्हालाही रक्कम आणखीन एकदा गुंतवणुकीसाठी लावावी लागेल. अशा वेळेस 15 वर्ष दहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला फक्त 20 लाख 48 हजार 297 रुपये व्याज मिळेल. पंधराव्या वर्षी तुम्हाला एकूण 30 लाख 48 हजार 997 रुपये एवढी रक्कम मिळेल. ज्यामध्ये वीस लाख 48 हजार 297 रुपये तुम्हाला निवळ व्याजातून मिळतील. अशाप्रकारे पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही वीस लाख रुपये निव्वळ व्याजातून नफा मिळू शकतात.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा