PM Kisan Yojana 20th installment date : देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 जुलै 2025 रोजी बिहारच्या मोतीहरी येथे एक या कार्यक्रमात पीएम किसन योजनेचा 20 वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अध्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, सरकारी सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे. PM Kisan Yojana 20th installment date
काय आहे Pm किसान योजना? शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अद्याप प शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणारे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत नसेल तर तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये बँक खात्यात जमा केले जातात ( प्रत्येकी ₹2,000). आतापर्यंत 19 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचलेले आहेत. 20वा हप्ता जुलै महिन्यात (18 जुलै )येण्याची शक्यता आहे.
तुमचं नाव यादीमध्ये आहे का? अशाप्रकारे तपासा!
– वेबसाईटवर जा : https://pmkisan.gov.in यानंतर ‘Farmer’s Corner’ मध्ये लाभार्थी यादी वरती क्लिक करा. राज्य, जिल्हा, उपजिल्हा, तालुका व गाव निवडा. Get Report या पर्यावरण क्लिक करून तुम्हाला तुमचे नाव आहे का ते दिसेल.
तुम्हाला हप्ता मिळाला नाही तर हे गोष्ट चेक करा
E-KYC पूर्ण करा त्यासाठी ओटीपी आधारित केवायसी पूर्ण करावी लागणार आहे, Aadhaar update करा तुमचं नाव व माहिती आधार प्रमाणे सुसंगत ठेवा. बँक खाते तपशील तपासा – चुकीची IFSC कोड, खाते क्रमांक यामुळे हप्ता अडकतो. लाभार्थी स्थिती (beneficiary status) तपासा आणि आधार किंवा मोबाईल नंबर टाकून तुमचा स्टेटस पाहू शकता.
नवीन शेतकऱ्याची नोंदणी कशी करणार?
‘New Farmer Registration’ या पर्यावर क्लिक करा. आधार क्रमांक, बँक तपशील व जमिनीची माहिती भरून फॉर्म सबमिट करा. राज्य सरकारकडून पडताळणी पूर्ण झाल्यावर तुमचं नाव यादीत समाविष्ट होईल. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाल्यास तुम्हाला जर हप्ता नाही आला तर केवायसी करा. मोबाईल नंबर आधार बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे. शेवटचा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जमा झाला होता आणि या योजनेचा शेतकऱ्यांनी फायदा घेणे खूप गरजेचे आहे.
शेतकरी बांधवांनो, प्रसार माध्यम व काही
माहितीस्त्रोतांच्या आधारे, जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती 20 वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपलं नाव यादीत आहे का, बँक तपशील योग्य आहे का, केवायसी पूर्ण आहे का तपासावा. अन्यथा हप्ता तुमचा अडकू शकतो.
(Disclaimer: वरील माहिती प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)