Petrol pump : आपण सगळेच कुठे ना कुठे पेट्रोल पंपावर गेलोच आहोत. आपल्याला गाडी पेट्रोल डिझेल भरताना तिथलं बोर्ड सहज वाचला असेल, XYZ पेट्रोल पंप. पण कधी मनात तुमच्या विचार आलाय का? डिझेल पण विकतात तिथेच मग नाव फक्त पेट्रोल पंप?
हा प्रश्न छोटासा वाटतो, पण त्या मागे इतिहास, समाज, भाषा आणि व्यवहाराची गुंतागुंत आहे. जरा डोकं लावून त्यातील तुम्हाला विषय पेट्रोल पेक्षा जास्त रोजचे वाटेल! Petrol pump
आपण जरा मागे जाऊया 1900 च्या सुरुवातीला, जेव्हा भारतात मोटारी आल्या होत्या. तेव्हा जास्त करून गाड्या पेट्रोल वरच चालत असत. डिझेलवर चालणाऱ्या गाड्या खूपच कमी होत्या. डिझेल इंजन त्याकाळी महागडी, अवजड आणि कमी वेगाची होती. ती मुख्यता ट्रक, ट्रॅक्टर, बस किंवा मोठ्या मशीन साठी वापरली जायची. पण सामान्य माणूस ज्याच्या घरी बुलेट, स्कूटर किंवा छोटी गाडी होती. तो पेट्रोल वरच गाडी चालवत असे.
ते काळाचे इंधन विक्री केंद्र सुरू झाली, ती फक्त पेट्रोल देत असत. मनोज त्यांना सरळ पेट्रोल पंप म्हटले गेले. आणि मग एकदा नाव पडलं की तेच पुढे सुरू राहिले.
लोकांच्या मनात पेट्रोल बसलं
साधं उदाहरण घेऊया, कोणतही टूथपेस्ट आपण त्याला कोलगेट म्हणतो, किंवा फेविकॉल म्हणाले की चिटकवन आठवतं. तसंच इंधन स्टेशनचं नाव पेट्रोल पंप मनात घर करून बसले. म्हणजे पंपावर डिझेल आहे, सीएनजी आहे, कधी एलपीजी देखील मिळते. पण आपण डिझेल पंप नाही म्हणत ही सवय झाली.
आपण 2025 मध्ये जगतोय, तरीही आज रस्त्यावर जास्त गाड्या पेट्रोल वरच चालतात. बाईक, स्कूटर, स्वस्तकार बहुतेक सगळं पेट्रोलवरच गिअर घेतात. डिझेलवरच्या गाड्या कमी झाल्या आहेत, मुख्यता: ट्रक SUV, बस आणि काही डिझेल कोर्स. त्यामुळे ग्राहकांच्या प्रमाणात पेट्रोल घेणारे जास्त आहेत. आणि जे जास्त विकलं जातं, त्यांचं नावही सर्वसामान्यांच्या मनात जास्त टिकतं.
बाहेर देशात काय म्हणतात?
भारतात आपण पेट्रोल पंप म्हणतो पण परदेशात याला वेगळेच नावांची ओळख आहे. अमेरिकेमध्ये Gas station, ब्रिटनमध्ये Petrol station, Australia मध्ये Servo, कॅनडामध्ये Filling station आपल्याकडेही इंधन टेशन किंवा फ्युल स्टेशन ही अधिकृत नाव असली, तरी सामान्य जनता अजूनही पेट्रोल पंपच वापरते. हीच भाषा जगण्याची ताकद असते.
आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे पेट्रोल पंप आणि डिझेल दोन्हीही पेट्रोलियम म्हणजे कच्च्या तेलापासून बनवतात. म्हणूनच पेट्रोल हा शब्द केवळ त्या इंधनापुरता नाही तर संपूर्ण इंधन कुटुंबाचा प्रतिनिधी म्हणून वापरला जातो. जसं धान्य म्हटले की तांदूळ गहू ज्वारी सगळे धरलं जातं, तसंच पेट्रोल पंप म्हटले की पेट्रोल डिझेल सीएनजी सगळं त्यात आलं.
आजारी पेट्रोल पंपावर UPI, स्कॅन क्युअर आणि कार्ड पेमेंट झाले, इलेक्ट्रिक चार्जिंग मिळतं, तरी पाठीवर नाव पेट्रोल पंपच आहे. उद्या पंप वरती इलेक्ट्रिक कार चार्ज होतील, डिझेल मिळणार नाही, तरी तो पेट्रोल पंपच राहील. हे म्हणजे जसं रेडिओचा शब्द आजही वापरतो आपण, जरी कुणी त्यावर AIR ऐकत नसेल, तरी.
तांत्रिकदृष्ट्या पाहिले, तर इंधन टेशन हे नाव अधिक योग्य आहे. आपल्याकडची भाषा ही लोकांच्या रोजच्या बोलण्यावर आधारलेली असते. जे नाव एकदा मनात, जीवदानी रुटीनमध्ये शिरलं ते तसंच चालतं. तुम्ही आजच्या तरुणाला म्हणाला जाईल केंद्रावर तो लगेच विचारेल ते काय आहे?.
पेट्रोल पंप हे नाव फक्त इतिहासाची देणगी नाही, तर ते आपल्या जीवनशैलीचं, मुलीचा आणि सवयीचं प्रतिबिंब आहे. ज्याप्रमाणे आपण मोबाईल म्हणतो, तरी तो स्मार्टफोन असतो. बिस्किट म्हणतो, तरी तो पार्ले G निघत तसंच पेट्रोल पंप म्हणतो तरी तरी त्यावर डिझेल असतं हे माहीत असतं.
हे पण वाचा | पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी घसरण..! या तारखेपासून लागू होणार नवीन दर…