PCMC Bharti 2023: पिंपरी महापालिकेत 16 हजार पदाची मेगा भरती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PCMC Bharti 2023:— सुधारित आकृतीबंध मजुरांसाठी राज्य सरकारकडे

महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधात 16000 नवीन पदाची भरती प्रस्ताव केला आहे. सध्याच्या स्थितीत महापालिकेच्या 7000 कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनावर वर्षाला सुमारे 720 कोटीचा खर्च होतोय. नवीन जागा भरल्यानंतर हा खर्च सुमारे 1400 कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महापालिकेची आर्थिक घडी विस्कटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुधारित आकृतीबद्ध मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आला.

पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे जवळपास 30 लाख लोकसंख्या झाली आहे. त्यामुळे महापालिकेला नागरिकांना मूलभूत हक्क, सेवा व सु-सुविधा पुरवण्यासाठी तान येत आहे. मनुष्यबळ वाढवण्यासाठी नवीन आकृतीबंध तयार करून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले. राज्य शासनाच्या नियमानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगारावर म्हणजे आस्थापना खर्च एकूण उत्पन्नाच्या 25% च्या आतच करण्यात यावा. मात्र अत्यावश्यक सेवेसाठी 1 हजार 578 जागा भरण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली.

हे पण वाचा:-शेतकऱ्यांना पिक विमा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती

नागरिकांना से सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेत मनुष्यबळाची गरज आहे. प्रत्येक महिन्याला सुमारे 30 ते 40 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. अनेक वर्ष नोकरी भरती न झाल्याने मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे. नोकरी भरती नंतर सर्व आठ क्षेत्रात कार्यालयात सुरळीत व गतीमय पद्धतीने सेवा व सुविधा पुरवणे सोपे होईल. असा दावा प्रशासनाने राज्य शासनाला केला आहे.

PCMC Bharti 2023:

महापालिकेचा सुधारित आकृतीबंध मुजरासाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्याला अजून मंजुरी मिळाली नाही. शासनाने 1578 अत्यावश्यक सेवेतील पदांची भरती करण्यास मंजुरी दिली आहे. ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुधारित आकृती बंधाराला मान्यता मिळणे नंतरही सर्व जागा भरता येऊ शकणार नाहीत. पगारावरील खर्चाच्या मर्यादेचे पालन केले जाणार आहे. असे विठ्ठल जोशी उपयुक्त सामान्य प्रशासन विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे म्हटले आहेत.

सात हजार अधिकारी कर्मचारी-महापालिकेमध्ये मंजूर जागा 11 हजार 513 आहे. यापैकी सध्याच्या स्थितीत 7 053 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहे. त्यांच्या वेतनासाठी धर्म साठ कोटी तर दरवर्षी 720 कोटी खर्च होत आहे. हे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने महापालिकेने सुधारित आकृतीबंध तयार केले आहे.

सुधारित आकृतीबंध पदे

वर्ग प्रस्ताव जागा

वर्ग 1476
वर्ग 2557
वर्ग 38041
वर्ग 47764

एकूण जागा – 16 हजार 838

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

असाच नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

3 thoughts on “PCMC Bharti 2023: पिंपरी महापालिकेत 16 हजार पदाची मेगा भरती”

Leave a Comment

error: Content is protected !!