Pahalgam Terror Attack Live : देश पुन्हा एकदा दुःख, संताप आणि लढ्याच निर्णय क्षनी उभा आहे. पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांचा बळी गेला. यामध्ये सहा जण महाराष्ट्रातील असल्याचा दुःख वास्तव्य आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशामध्ये संतापाचा वातावरण निर्माण झालेला आहे. या हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी केंद्र सरकार आणि सुरक्षा दल सज्ज झाले असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थेट इशारा दिला आहे. “दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा ही मोठी शिक्षा दिली जाणार” Pahalgam Terror Attack Live
या हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून पाकिस्तान विरोधामध्ये पाच मोठ्या कारवाई करण्यात आलेल्या आहे. पहिल्या टप्प्यामध्ये, घनदाट जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना शोधून संपवण्याची ऑपरेशन सुरू झाली आहे. दोन ठिकाणी चकमकी झाल्या आहेत. दुसरा टप्पा म्हणून पाकिस्तानला जागतिक स्तरावर बेनकाब करण्यासाठी राज्य नैतिक हालचाली सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीला परतताच संरक्षण मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय आणि गुप्तचर यांच्यामध्ये दिवसभर बैठकाचं सत्र झाल्याचं वृत्त आहे. Pahalgam Terror Attack Live
इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, हल्ला करणारे सात दहशतवादी होते. त्यापैकी चार ते पाच जण पाकिस्तानातील आहेत. हे त्यांच्या उर्दू लहेजावरून ओळखले गेले. ही भाषा पाकिस्तानातील एक विशिष्ट भागात वापरली जाते. सध्या हे दहशतवादी पीर पांजर रेंजमध्ये पळून गेले असून, सुरक्षा यंत्रणा त्यांच्या मागावर आहे.
या पार्श्वभूमी वरती पहलगाम हल्ल्याची तुलना थेट इजराइल मधील हमास हल्ल्याशी केली जात आहे. त्यामुळेच भारत कोणता मोठा निर्णय घेईल, याकडे संपूर्ण जगाचा लक्ष लागले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी थेट इशारा दिला आहे की, या हल्ल्याचे सूत्रधार कोण आहे ते ओळखलं गेलं आहे आणि त्यांना धडा शिकवला जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे ऐतिहासिक आणि जाज्वल्य भाषण दिलं. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी दोन मिनिटांचं मौन पाळून हत्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आणि नंतर थेट दहशतवाद्यांना इशारा दिला. “भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या पाठीराख्याला ओळखेल, माग काढेल आणि शिक्षा करेल. ही शिक्षा त्यांच्या कल्पनाही जिथे पोहोचत नाही तिथपर्यंत जाईल”
या भाषणातील सर्वात ठळक आणि लक्षविधी भाग होता जेव्हा पंतप्रधानांनी इंग्रजीतून बोलत थेट जागतिक समुदायाला इशारा दिला “India will trance till them the end of the earth, India’s spirit will not be shaken by such cowardly acts” हे शब्द केवळ राजकीय नव्हेत, ते एका स्फोटक देशाच्या, एका ज्वलंत नेतृत्वाच्या आणि 140 कोटी भारतीयांच्या भावनेचे प्रतिनिधित्व करणारे होते.
ते पुढे म्हणाले, “दहशतवाद्यांना मातीत गाळण्याची वेळ आली आहे. देशातील प्रत्येक नागरिक या लढ्यात सरकारच्या आणि सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येक जण आता आपल्या सोबत आहे.”
शेवटी एकच, हे केवळ हल्ला नव्हता. हे भारताच्या आत्म्यावर झालेलं आक्रमण होतं. आता केवळ कठोर कारवाई नव्हे, तर अंतिम न्याय होईपर्यंत देश थांबणार नाही. दहशतवादाला पूर्णत: नष्ट करण्याचा संकल्प आज प्रत्येक भारतीयांच् मनात पेटला आहे. आणि पंतप्रधानाच्या शब्दात सांगायचं झालं तर “शिक्षा कठोरच असेल आणि ती होणारच!”