Onion News : राज्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात 25 26 27 या तारखेला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केले आहे. अशातच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय लागू केल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आलेले आहे. कांदा निर्यात बंदीचा निर्णय लागू केल्यामुळे या निर्णयाचे पडसाद राज्यभर पाहायला मिळत आहे.
आक्रमक झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आभार आंदोलन सुरू केलेले आहे. व्यापाऱ्यांनी ही आंदोलनाला पाठिंबात दर्शवित बाजार समितीमध्ये लिलाव बंद ठेवलेला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकार ही आता अडचणी वाढ झाल्याची दिसून येत आहे. अशातच आता येत्या दोन दिवसांमध्ये कांदा निर्याती बाबत निर्णय घेतला जाईल असे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलेले आहे.
केंद्र सरकारच्या याच निर्णयामुळे कांदे निर्यातीमध्ये बंदी आलेली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. अशातच निसर्गाची साथ न मिळाल्यामुळे कसेबसे आलेले या पिका बाबत शेतकऱ्यांची निराशा दिसून येत आहे. याबाबत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करत असून, दोन दिवसांमध्ये यावर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल.
शेतकऱ्यांना या प्रश्नाचे लवकरच दिलासा मिळेल. असे त्यांनी यावेळी म्हटलेले आहे. त्यामुळे आता सरकारकडून याबाबत काय निर्णय होणार याकडे सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
नुकसानी बाबत लवकरच निर्णय
निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकरी परेशान झाले होते. त्यात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सध्या सुरू असलेला हिवाळी अधिवेशनामध्ये हितकारक निर्णय लवकरच घेतला जाईल.
ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रीम रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्या शेतकऱ्यांना पुढील आठ दिवसांमध्ये ती रक्कम दिली जाणार आहे. असेही धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटलेले आहे. तर पिक काढणीनंतर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर पिक विमा देण्याचे आदेश पीक विमा कंपन्यांना दिला जाईल असेही मुंडे यांनी यावेळी म्हणाले.