Thursday

13-03-2025 Vol 19

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! महाराष्ट्रातील या बाजार समितीमध्ये कांद्याला मिळाला सर्वाधिक दर जाणून घ्या नवीन बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion market price : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. कांद्याच्या भावामध्ये मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे. व हा दर आणखी वाढणार का बाजार तज्ज्ञांचा काय म्हणणे आहे देखील जाणून घेऊ. Onion market price

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे. कारण म्हणजे बऱ्याच दिवसापासून बाजार भाव कमी होता. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा कांदा हा कवडीमोल दरामध्ये विकावा लागत होता. लोकसभेनंतर अनेक बाजारामध्ये कांद्याचा भाव वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळत आहे.

खरंतर गेल्यावर्षी कांदा बाजार भाव हा खूपच कमी होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्या मध्ये अतिवृष्टी पावसाचा मोठा खंड नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकऱ्यांनाही मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले होते. परंतु केंद्रातील सरकारचे नाफेड बाजार स्टॉक मधील कांदा खुल्या बाजारात विक्रीसाठी आणण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांदा बाजार भाव मध्ये मोठी वाढ झाली आहे.

पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कवडीमोल दारामध्ये कांदा विकावं लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आलेले आहे. महाराष्ट्रातील एका बाजारामध्ये कांद्याला तब्बल सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळालेला आहे. हा विक्रमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे परिस्थिती निर्माण झालेली आहे.

कोणत्या बाजारात मिळाला कांद्याला सर्वाधिक दर

आम्हाला मिळाल्या प्रसार माध्यमाच्या माहितीनुसार आज शिक्रापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे. इथे झालेल्या लिलावामध्ये कांद्याला 6700 प्रतिक्विंटल असा विक्रमी दर मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नक्कीच अंदाजे वातावरण निर्माण झाले आहे.

या बाजारामध्ये लाल कांद्याची 289 क्विंटल आवक झालेले आहे. कांद्याला किमान 2800 ते कमाल 700 रुपये असा सरासरी प्रतिक्विंटल दर मिळालेला आहे. तसेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पांढरा कांदा किमान हजार रुपये ते कमाल 5200 असा सरासरी दर मिळालेला आहे.

तसेच हिंगणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे. येथे किमान 3200 ते कमाल 5000 आणि सरासरी 3200 असा प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

Rushi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *