Onion Export Ban News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारत सरकारने कांदा निर्यातीवरील निर्बंध काढण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारत सरकारने कांदा निर्यातीवरील निर्बंध काढण्यास सुरुवात केली आहे सरकारने शेजारील देशांना कांद्याची निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. पण यावर काही मर्यादा घातलेले आहेत.
या तीन देशाला कांद्याची निर्यात होणार
भूतान सोबत बहारीन आणि मॉरिशसला कांद्याची निर्यात होणार आहे. या दरम्यान देशांतर्गत बाजारपेठेतील पुरवठा सुधारल्यानंतर कांद्याच्या दरात घसरण झाली होती. त्यामुळे सरकारने कांद्याची निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेजारील काही देशांना महागड्या कांद्यापासून दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर सरकारने बहारीन आणि मॉरिशस सह शेजारील भूतान या तीन देशांना कांदा निर्णयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
विदेश व्यापार महा संचालनालयाने (DGFT) एक अधिसूचना जारी केली आहे. यामध्येही माहिती देण्यात आली आहे. भूतान सोबत बहारीन आणि मॉरिशसला या देशांना भारतातून कांद्याचा पुरवठा होणार असल्याचे अधिसूचनेत सांगितले आहे. कांद्याची निर्यात नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपर्ट लिमिटेड च्या माध्यमातून होणार आहे.
कोणत्या देशाला किती कांदा निर्यात होणार?
विदेश व्यापार महासंचालनाल्याने सांगितलेल्या अधिसूचनेत भुतांना 3000 मॅट्रिक टन कांदा निर्यात करण्यात मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे बहारीनला 1200 मॅट्रिक टन कांदा निर्यात करण्यास मान्यता देण्यात आले आहे. आणि मॉरिसिसला 550 मॅट्रिक टन कांद्याचा पुरवठा करण्यास मान्यता देण्यात आले आहे. भारत सरकारने आठ डिसेंबर 2023 ला कांद्याचे निर्यात बंदी वर निर्बंध लावले होते.
देशांतर्गत बाजारपेठेत कमी उपलब्धता आणि गगनाला भिडलेल्या किमतीमुळे कांद्याची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. डिसेंबर 2023 ते मार्च 2013 24 या कालावधीत कांदा निर्यातीवर ही बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव नियंत्रणात राहण्यास मदत झाली आहे. त्यानंतरच सरकार निर्बंध स्थितीत करण्यास सुरुवात केली आहे. Onion Export Ban News
निर्यात बंदी बाबतचे सर्व निर्बंध हटविले नाहीत
सरकारने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये कांद्याच्या निर्यातीवर पहिल्यांदा बंदी घातली होती. त्यावेळी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% निर्यात शुल्क लावले होते. त्यातून कोणताही सरकारचा फायदा होत नसताना सरकारने किमान निर्यात दर 800 डॉलर प्रति टन निश्चित केला आहे. मात्र त्यानंतरही सरकारला फारसा फायदा झालेला नाही त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. तरीही कांदा निर्यातीवर सर्व निर्बंध हटलेले नाहीत केवळ मित्र राष्ट्रांना मर्यादित प्रमाणात कांद्याचा पुरवठा करण्यास मान्यता देण्यात आले आहे.
याचा शेतकऱ्यांना फायदा होणार का?
यादरम्यान सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा कांदा निर्यातीला दिलेल्या परवानगीचा शेतकऱ्यांना काही फायदा होणार क? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र सध्या शेतकऱ्याजवळील मोठ्या प्रमाणात कांदा संपला आहे. ज्यावेळी शेतकऱ्याकडे कांदा होता त्यावेळी दर नव्हता दर वाढले की सरकारने निर्यात बंदी लागू केली होती.
मात्र आता कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. पण ते देखील कमी प्रमाणात निर्यात करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा किती फायदा होणार हे सांगता येत नाही. निर्यातीला परवानगी दिली तरी जास्त फायदा होणार नाही असं मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
हे पण वाचा:- सर्वसामान्य नागरिकांना मोदी सरकारची भेट..! या तारखेला मिळणार LPG सिलेंडरचे अनुदान, सरकारवर 12000 कोटीचा बोजा
One thought on “सरकारचा मोठा निर्णय; या तीन देशांना कांद्याची निर्यात होणार, कांद्याच्या भावात झाली मोठी वाढ?”