New Weather Forecast : राज्याच्या हवामानामध्ये होणारा बदल पाहता शेतकऱ्यांची चिंता वाढताना दिसत आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. हवामान विभागाचा अंदाज शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी दिसून येत आहे. राज्यात तसेच उत्तर भारतातील दिल्ली उत्तर प्रदेश आणि इतर राज्यात देखील थंडीचा जोर वाढला आहे.
परंतु या दरम्यान भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यासोबत महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार तमिळनाडूमध्ये 15 ते 17 डिसेंबर, केरळ आणि महिमध्ये 16 ते 17 डिसेंबर, तर लक्षदीप मध्ये 17 आणि 18 डिसेंबर दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर काही ठिकाणी वादळी वारसदार पिढीचा अंदाज आलेला आहे.
केरळमध्ये येत्या 38 तासात वादळी वाऱ्यास अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून जम्मू-काश्मीरला मुजफराबाद मध्ये हलका पाऊस आणि ही मोर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
पूर्व आसाम, अरुणाचल प्रदेश, लक्षद्वीप, आणि दक्षिण केरळ मध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता असून दिल्लीत तापमानाचा पारा घसरल्याने पंजाब आणि हरिणामध्ये दात धुके पडण्याचा अंदाज आहे.
हवामान खात्याने वर्तलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे उर्वरित भागात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी थंडी वाढण्याची शक्यता आहे.