Namo Farmer First Instalment : केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्त्याचे वितरण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात हे वितरण होणार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यासह मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहेत.
केंद्र सरकार द्वारे सुरू असलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाची भर घालण्यासाठी नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे पहिले आपल्यासाठी राज्य सरकार द्वारे 1हजार 720 कोटी रुपयांचा निधीस मान्यता देण्यात आली आहे.
केंद्र सरकारद्वारे चौदावा हप्ता ८५.६० लाख शेतकऱ्यांना मिळाला होता मात्र नवीन अभिलेखाच्या तपासणी केल्यानंतर राज्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या ९३.०७ लखा झाली आहे. वास्तविक केंद्राचा १४ वा हप्ता ८७.६० लाख शेतकऱ्यांना दिला गेला आहे.
१हजार ८३३ कोटी ४० लाख रुपये वितरित करण्यात आले सध्या राज्य सरकारच्या नमुची लाभार्थी संख्या नेमक किती याबाबत स्पष्टता नाही.
कृषी विभागाचे लाभार्थी पडताळणी
- पीएम किसन योजनेच्या 14 हप्त्याचे लाभार्थी ८५ .६०
- राज्यातील एकूण पात्र लाभार्थी :९३.०७
- भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत केलेले लाभार्थी ९१.१२
- अद्यावत प्रलंबित लाभार्थी:१.१५ लाख
- बँक खाती आधार सलग्न प्रलिंबित लाभार्थी ५.९८ लाख
- ई – केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित लाभार्थी ५.२६ लाख