Namo Farmer First Instalment : शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी अंतर्गत सहा हजार रुपये वर्षी देण्याचा निर्णय शेतकऱ्यांना आता वर्षाला 12 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
आज गुरुवारी शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये वितरित करण्यात आलेले असून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्या शेतकऱ्यांना सकाळपर्यंत ही रक्कम वितरित करण्यात येईल.
राज्यातील शेतकऱ्यांना प्रधान किसन सन्मान निधी या योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून नमो शेतकरी सन्मान योजनेला राज्यात मंजुरी दिल्यामुळे याचा लाभ पात्र शेतकऱ्यांनाच होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. यामुळे वर्षाकाठी राज्यातील शेतकऱ्यांना दोन्ही योजनेचे मिळून जवळ जवळ बारा हजार रुपये मिळणार आहेत.
राज्य सरकारचा नमो शेतकरी महासंबंधीचा पहिला हप्तपती दोन हजार रुपये आणि केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये असे एकूण जवळपास चार हजार रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. मागील चार महिन्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना त्यांची बँक खाते आधार सिडंग करून घेण्याचे निर्देश देत होतें.
ज्या शेतकऱ्यांनी त्यांची ई- KYC करायचे राहिले आहे त्या शेतकऱ्यांन नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळणार नाही. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर तुमची ई-केवायसी करून घ्या.