Mukhymantri Manjhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील करोडो महिलांनी अर्ज केले आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या खात्यात सात हप्त्याचे एकूण दहा हजार पाचशे रुपये जमा देखील झाले आहेत. मात्र आता या योजनेतून निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांवर कारवाई होणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या योजनेतून काही महिलांनी स्वतःहून अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मिळालेल्या लाभाची रक्कमही परत करावी लागणार नाही. मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभ कुठे नाकारावा व कसा नाकारावा? हे अनेक महिलांना माहीत नाही. तर आपण त्याबद्दल आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले! या लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल होऊ लागले आहेत?
अपात्र महिलांनी कुठे करावा अर्ज?
लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय मध्ये मी लाडकी वहिनी योजनेसाठी अपात्र असल्याने मला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको असा अर्ज करावा लागेल. ज्या महिलांना योजनेचा लाभ नको आहे अशा महिला संबंधित कार्यालयात जाऊन अर्ज भरून लाभ नाकारू शकतात. लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील लाभ नाकारण्यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावा लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून लाडकी बहीण योजनेचा लाभ नको असलेला अर्ज भरून सबमिट करायचा आहे.
कापसाच्या बाजारभावात वाढ होणार का नाही? पहा आजचे कापुस बाजार भाव
प्रसारमाध्यमांमध्ये लाडकी बहीण योजनेचे निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे. आणि ज्यांच्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळून इतर चार चाकी वाहन आहे. मात्र तरी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांवर कारवाई करून आतापर्यंत मिळालेल्या लाभाची दंडासह व सुरू केली जाणार असल्याची चर्चा होत आहे. Mukhymantri Manjhi Ladki Bahin Yojana
सर्वसामान्यांना दिलासा! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी घसरण, तुमच्या शहरात दर किती येथे पहा? नी
लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची तपासणी सुरू आहे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्यापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत. मात्र यानंतर आता या योजनेची तपासणी सुरू आहे. तपासणी प्रक्रिया पार पडल्यानंतर निकषात न बसणाऱ्या महिलांवर कारवाई केली जाणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी योग्य माहिती देणे आवश्यक आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाडक्या बहिणीकडून पैसे वापस घेतले जाणार का? असा प्रश्न देखील महिलांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.