Monsoon Update : राज्यात या तारखेपासून, सुरू होणार परतीचा पाऊस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update : राज्यामध्ये सध्याच्या घटकेला परतीच्या पावसाचे वातावरण तयार झालेले असून, एकंदरीतच राज्यात 10 ते 11 ऑक्टोंबर दरम्यान मान्सून परतण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. आज दिवसभर पालघर, ठाणे, रायगड, तसेच मध्य महाराष्ट्राच्या पुणे, सांगली, सातारा, जळगाव, धुळे, नंदुरबार नाशिक तसेच विदर्भ व मराठवाड्यात पावसाची शक्यता नाही. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात या भागातून मान्सून परतण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र दक्षिण कोकणच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पुढील तीन दिवस आद्रता तयार होऊन पावसाचे कमी प्रमाण होणार आहे. त्यामुळे या भागातील पुढील पाच ते सहा दिवसांमध्ये मान्सून परतेल.

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात राज्यामध्ये दक्षिण मध्ये भाग वगळता अन्य भागातून मान्सून पडतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोकणातून मान्सून येत्या 10 ऑक्टोबर पासून परतण्याची शक्यता आहे. मान्सून परतीचा प्रवास राजस्थान मधून साधारणता 17 सप्टेंबर दरम्यान सुरू होत असतो यावर्षी आठवडाभर उशीर झाल्याने तो उशिरा सुरू होणार असल्याचे दिसत आहे.

आतापर्यंत संपूर्ण राजस्थान, हरियाणा , पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, तसेच उत्तराखंड , पश्चिम उत्तर प्रदेश, गुजरात मधील सौराष्ट्र व कच्च भागातून मान्सून परतला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हा प्रवास आणखी व्यागात होईल मान्सूनच्या परतीची रेषा सध्य गुरुग्राम, धर्मशाला, इंदूर , बडोदा व पोरबंदर अशी तयार झालेली आहे. देशातील विविध राज्यांमधून पावसाचे प्रमाण कमी झालेले दिसून येत आहे. तरीही परतीच्या वाटेवर निघालेला हा मोसमी पावना जाता जाता सुद्धा धुमाकूळ घालणार आहे. सध्या देशाच्या अनेक भागांमधून पावसाचा या बदलत्या हवामानाचे चिन्ह पाहायला मिळत आहेत.

Leave a Comment