Monsoon Update : राज्यामध्ये आज ना उद्या परतीचा पाऊस सुरू होणार आहे. आशा मध्ये हवामान खात्याने पाऊस धुमाकूळ घालणार असून राज्यामध्ये चांगल्या प्रकारचा परतीचा पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. राज्यसह देशांमध्ये देखील परतीचा पाऊस हजेरी लावणार आहे.
येत्या रविवार पर्यंत देशात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा हवामान विभागाकडून सांगण्यात आलेले आहे याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे.
राज्यातून नैऋत्य मोसमी वारे माघारी फिरण्यास सुरुवात झालेली असून, परिणामी राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे शुक्रवारी 6 ऑक्टोबर रोजी हवामान विभागाने याबाबत माहिती दिलेली आहे.
हे पण वाचा : पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी जाहीर गावानुसार यादी मध्ये तुमचे नाव पहा.
पुणे मुंबई उत्तर महाराष्ट्र तसेच मध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे तर मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक ठिकाणी तापमान कोरडे राहणार असल्याची शक्यता. हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. दरम्यान आज मुंबईमध्ये आणि उपनगरातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामाना खात्याकडून देण्यात आलेली आहे.
तर परिसरात काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याची अंदाज देखील हवामान विभागाने दिलेला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे असे हवामान विभागाकडून सांगण्यात आलेले आहे.