Monsoon In Maharashtra: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात मान्सून कुठपर्यंत पोहोचला आहे याबद्दल हवामान विभागाने मोठे अपडेट दिली आहे. महाराष्ट्र राज्यात मान्सूनची प्रगती सुरू असून, उद्या दुपारपर्यंत मान्सून विदर्भ पर्यंत पोहोचला आहे. जळगाव, अमरावती आणि चंद्रपूर पर्यंत मान्सून येऊन पोहोचला आहे.
हवामान विभागाच्या दररोज नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
सध्या देशातील सर्वच लोकांचे लक्ष मानसून कडे लागलेले आहे. महाराष्ट्रात दरवर्षीच्या तुलनेत लवकर मान्सून दाखल होणार आहे. आजपर्यंत मान्सून विदर्भापर्यंत पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार महाराष्ट्रात विदर्भ पर्यंत मान्सून येऊन पोहोचला आहे. Monsoon In Maharashtra
दुसरीकडे संपूर्ण भारतात पाहिले तर तेलंगणा राज्यात मान्सून दाखल झालेला आहे. छत्तीसगडच्या काही भागात मान्सून पोहोचला असल्याची माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत माहितीनुसार मान्सून महाराष्ट्रात देखील दाखल झाला आहे. हवामान विभागाचे अधिकारी के एस उसळीकर यांनी या संदर्भात सर्व अपडेट दिले आहे.
15 जूनला उर्वरित 75 टक्के पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार! शिंदे सरकारचा मोठा निर्णय
मानसून कुठपर्यंत पोहोचला आहे?
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून कुठपर्यंत याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. हवामान विभागाने जारी केलेल्या नकाशानुसार नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात विदर्भ पर्यंत पोहोचले आहे. गुजरात मधील नवसारी, महाराष्ट्रात जळगाव, अमरावती आणि चंद्रपूर पर्यंत मान्सून दाखल झाला आहे. तेलंगणामध्ये देखील सर्व भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. छत्तीसगड मध्ये देखील मान्सूनचा पाऊस दाखल झाला आहे. विजापूर सुकुमार मलखनगिरी, विंझिग्रम आणि इस्लामापूर जवळ मान्सून दाखल झाला आहे.
LPG गॅस सिलेंडरची किंमत 350 रुपयांनी घसरली! 15 जून पासून नवीन दर लागू, येथे पहा नवीन किंमत
महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन कसे आहे?
महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यांमध्ये काल जोरदार मान्सूनचा पाऊस झाला आहे. वादळ वारे आणि विजेच्या कडकडाटा सह झालेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील चार महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये हिंगोली, बसवा, सिरसम आणि माहिवरा या चार महसुली मंडळांचा समावेश आहे. पहिल्या पावसामुळे हिंगोली ची कायाधू नदी ला मोठा पूर आला आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये सरासरी 28 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! या लोकांना शिधापत्रिकांच्या यादीतून काढून टाकण्यात आले
महाराष्ट्र मधील यवतमाळ जिल्ह्यात रात्री जोरदार पाऊस बरसला आहे. पुसद, रुंजा, डोंगर खर्डा, कळंब, हिवरी, हिवरी संगम, सावना, महागाव, कसबा आणि बाबुळगाव तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नाका पार्टी येथे वादळी पावसाने अचानक सुटलेल्या वादळी अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली आहेत. यात 50 ते 60 छतावरील पत्रे उडून गेली आहेत. यात धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येत आहे. तसेच शेतकऱ्यांनी लागवडीसाठी आणलेले बियाणे खते यांचेही नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या घरांचा सर्वे करण्यात आला असून आपत्ती विभागाकडून नुकसानीसाठी मदत करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
या दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या काही भागांमध्ये ढगाणे गोंगाट घातलेला दिसत आहे. सोलापूर मध्ये ही ढगाळ वातावरण असून अधून मधून हलका पाऊस पडत आहे. एकूणच येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्रात जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
2 thoughts on “मान्सून महाराष्ट्रात कुठपर्यंत पोहोचला? हवामान विभागाने दिली नवीन मोठी अपडेट..”