Measuring Land : अनेकदा आपल्या सातबारावर जितकी शेत जमीन नमुद आहे. तीतकी प्रत्यक्षात का दिसतक नाही? असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना मनात येतो. त्यामुळे मग आपल्या जमिनीवर शेजारच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले का.
अशी शंका मनात येते. ही शंका दूर करण्यासाठी शेतजमीनची शासकीय पद्धतीने मोजणी करणे हा पर्याय समोर असतो. परंतु जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा ? आणि जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते.
जमीन मोजणीसाठी अर्ज आणि कागदपत्रे :
शेत जमिनीच्या हदीबाबत शंका निर्माण झाल्यास शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या तालुकास्तरीय उपअधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करू शकता.
- मोजणीसाठी अर्ज, असं याचं अर्जाचा शीर्षक यामध्ये सुरुवातीला तुम्ही ज्या तालुक्यातील कार्यालयात अर्ज सादर करत आहात त्या तालुका आणि जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे.
- त्यानंतर पहिल्या पर्यायपुढे अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता या विषयी माहिती द्यायची आहे. या अर्जदाराचे नाव, गावाचे नाव, तालुका आणि जिल्ह्याचे नाव लिहायचे आहे.
- त्यानंतर मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकारचा तपशील, हा दुसरा पर्याय आहे. यातील मोजणीचा कालावधी, आणि उद्देश लिहायचा आहे. त्यामुळे तालुक्याचे नाव गावाचे नाव आणि ज्या गट क्रमांकात येतो, तिथे तो गट क्रमांक टाकायचा आहे.
- तिसरा पर्याय आहे, सरकारी खजिनाथ भरलेली मोजणी फी रक्कम. त्यासमोर मोजणीची रक्कम लिहायचे आहे. आणि त्यासाठी चलन किंवा पावती क्रमांक आणि दिनांक लिहायचा आहे.
- आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे मोजण्यासाठी जी पी आधारली जाते तिची रक्कम किती क्षेत्रावर मोजणी करायची आहे आणि ती किती कालावधी करून घ्यायची आहे यावर ठरत असते.
- जमीन मोजण्याचे साधारणपणे तीन प्रकार पडतात. यात साधी मोजणीची सहा महिन्याच्या कालावधीत केली जाते. तातडीची मोजणी तीन महिन्यांमध्ये, तर अति तातडीची मोजणी दोन महिन्याच्या आत केली जाते. एक हेक्टर क्षेत्रावर आधी मोजणी करायचे असल्यास एक हजार रुपये, तातडीच्या मोजणीसाठी दोन हजार रुपये, तर अति तातडीच्या मोदी साठी तीन हजार रुपये आकारले जाते. यामुळे मग किती कालावधी मोजणी करून हवी आहे. यांचा शेतकरी तशी माहिती कालावधी या कॉलम मध्ये लिहू शकतात.
एकदा अर्ज जमा केली की तो ई-मोजणी या प्रणालीमध्ये फिड दाखल केला जातो. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून मोजणी साठी किती फी लागणार आहे. याचं चलन जनरेटर केल जात. त्याचं शेतकऱ्यान बँकेत जाऊन भरायचे असते. त्यानंतर मोजणीचे रजिस्टर नंबर तिथे तयार होतो. त्यानंतर शेतकऱ्याला मोजणी दिनांक, मोजणी येणार कर्मचारी, त्याचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक याची माहिती दिलेली असते.