Manoj Jarange | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. याच विषयाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई आंदोलनाचा मार्ग कसा असणार ते जाहीर केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कुठे मुक्काम असणार या संदर्भात माहिती दिली आहे. 20 जानेवारीला मराठा समाज मुंबईला जाणार. मराठा बांधवांनी मुंबईला जाण्याची तयारी ठेवावी असे आव्हान देखील त्यांनी यावेळी केली आहे.
मराठा आरक्षण मागणीसाठी म्हणून जरांगे पाटील 20 जानेवारी रोजी मुंबईकडे रवाना होणार आहेत. मनोज जरांगे म्हणाले प्रजासत्ताक दिना दिवशी म्हणजे 26 जानेवारीला आमचा मोर्चा मुंबई मध्ये धडकणार आहे. पुण्यामधून मराठा समाज जास्त सहभागी होणार आहे.
कोटींची संख्या तिथे पार होणार आहे. यावेळेस आम्ही स्वयंसेवक घेतले नाही प्रत्येकाने आपले नियोजन स्वतः करायचे आहे. ज्या ठिकाणी मुक्काम आहे. त्या ठिकाणी त्या मुक्काम स्थळ च्या शेजारी असलेल्या गावकऱ्यांकडून जेवणाची सोय होणार आहे. दररोज 90 ते 100 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी चालायचं इतरांनी गाडीत बसून प्रवास करायचा आहे.
जरांगे पाटील यांची घोषणा
20 जानेवारी 2024 –
सकाळी 9 वा- अंतरवाली सराटी पासून पद यात्रेस सुरुवात होईल
दुपारी भोजन – कोळगाव ता गेवराई
रात्री मुक्काम – मातोरी ता शिरूर
21 जानेवारी-
दुपारी भोजन – तनपुरवाडी ता पाथर्डी
रात्रौ मुक्काम – बाराबाभली ( करंजी घाट )
22 जानेवारी –
दुपारी भोजन – सुपा
रात्री मुक्काम – रांजणगाव ( गणपती )
23 जानेवारी –
दुपारी भोजन – कोरेगावं भीमा
रात्री मुक्काम – चंदननगर ( खराडी बायपास ) पुणे
24 जानेवारी –
पुणे शहर प्रवास – जगताप डेअरी – डांगे चौक – चिंचवड – देहूफाटा
रात्री मुक्काम – लोणावळा
25 जानेवारी –
दुपारी भोजन – पनवेल.
रात्री मुक्कामी – वाशी
26 जानेवारी –
चेंबूर वरून पदयात्रा –
आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होणार