माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होणार? नवीन अपडेट आली समोर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana Registration Update : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हि योजना जुलै महिन्याच्या अर्थसंकल्पनामध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत महिलांच्या खात्यावर ची सहा हप्ते जमा करण्यात आले आहेत. म्हणजे महिलांच्या खात्यावरती 9 हजार रुपये जमा झालेले आहेत.

परंतु मध्यंतरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या योजनेची अर्ज प्रक्रिया आणि लाभ थांबवण्यात आलेला होता. परंतु महिलांना आता डिसेंबर चा हप्ता मिळालेला आहे. त्यामुळे आता नवीन अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार असा प्रश्न महिलांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. याच बाबत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. Majhi Ladki Bahin Yojana Registration Update

लाडकी बहीण योजनेचे अर्ज प्रक्रिया कधी होणार सुरू

शासन अंतर्गत डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहेत परंतु अशा अनेक महिला आहेत त्यांनी अद्याप योजनेमध्ये अर्ज केलेला नाही राज्य सरकारच्या आगामी बजेटमध्ये महिलांना 2100 रुपये देण्यात येणार आहे. त्यानंतर या योजनेसाठी पुन्हा नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे योजनेचा लाभ घेऊ इच्छित असणाऱ्या महिलांना एक संधी निर्माण होणार आहे. परंतु त्यांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

अर्जाची पात्रता

  • या योजनेत अर्ज करण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे.
  • पात्र महिलांना एक जुलैपासून 1500 रुपयांच्या आर्थिक मदत देण्यात येत आहे.
  • आतापर्यंत महिलांच्या खात्यावरती नऊ हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत.

बँक आधार लिंक करणे आवश्यक

या योजनेत लाभ घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड बँक खाते ची लिंक करणे आवश्यक आहे. आतापर्यंत 12 लाखाच्या महिला होत्या त्यांचे आधार लिंक झालेली नव्हते. त्यांच्या खात्यावर देखील आता हळूहळू पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

आदिती तटकरे यांची माहिती

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. निवडणुकीमध्ये घोषणापत्रक लाडकी बहिण योजनेच्या पंधराशे रुपयांचा हप्ता 2100 रुपये वाढू अशी घोषणा केली होती. महिलांना आता 2100 रुपये मार्च महिन्यामध्ये होणारे अर्थसंकल्पनात मांडण्यात येईल असा सकारात्मक विचार केला जाईल. आतापर्यंत अडीच कोटींपेक्षा अधिक लाभार्थी महिला या योजनेमध्ये लाभ घेत आहेत. अध्याप नवीन नोंदणी सुरू करण्याचा निर्णय झालेला नाही, ज्या महिला पात्र ठरल्या आहे त्यांना आतापर्यंत सन्मान निधी पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

Leave a Comment