Majhi Ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर समोर येत आहे. 15 ऑगस्ट रोजी या भागातील लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत. विशेष म्हणजे पुढचे सहा महिने सलग महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये निश्चित जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या बाबत मोठी अपडेट दिली आहे.
लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र महिलांची यादी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
सध्या राज्यभरात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. राज्यातील लाखो महिलांना या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. अर्ज केलेल्या महिलांना या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. या महिन्याचे व मागील महिन्याचे मिळून एकूण तीन हजार रुपये 17 तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. तर काही भागातील महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत.
ई श्रम कार्ड धारकांच्या खात्यात ₹ 2,000 येण्यास सुरुवात झाली, तुमचे नाव याप्रमाणे तपासा
लाडक्या बहिणी योजनेचे पैसे किती दिवस मिळणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. पण राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील महिलांना पुढील सहा महिने तरी लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळणार आहेत. राज्यातील लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला दीड हजार रुपये कमीत कमी सहा महिने तरी शंभर टक्के मिळणार आहेत.
काही महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले तरी अजून देखील लाडकी बहिण योजनेचे नाव नोंदणी सुरूच आहे. सरकारने अडीच कोटी महिलांना योजनेचा लाभ देण्याचा अंदाज काढला होता. नोंदणीचा आकडा आजच्या घडीला दीड कोटी पर्यंत पोहोचला आहे. 17 ऑगस्ट पर्यंत पात्र महिलेच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा केले जाणार आहेत. Majhi Ladki Bahin Yojana
स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे वैयक्तिक कर्ज, येथे पहा अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना घोषित झाल्यापासून या योजनेचा प्रचार जास्त प्रमाणात केला गेला आहे. लाखोच्या संख्येने ज्या अर्थी महिला नोंदणी करतात त्याअर्थी त्यांनाही योजना आवडलेली आहे. या योजनेमुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आले आहेत. आर्थिकदृष्ट्या महिला आणखीन प्रबळ झाले आहेत. ही योजना अफवा नसून या योजनेचे पैसे महिलांना मिळण्यास सुरुवात देखील झाली आहे.
लाडकी बहीण योजनेसोबतच अन्नपूर्णा योजना मोफत शिक्षण यासारख्या अनेक योजनांचा जीआर शासनाने काढले आहेत. त्यामुळे या योजनेचा दुसऱ्या योजनेवर अजिबात नकारात्मक परिणाम घडलेला नाही. तुम्ही देखील या योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला 17 तारखेपर्यंत दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये मिळून जातील.
खाद्यतेलाचे दर झाले स्वस्त, जाणून घ्या 15 लिटर तेलाच्या डब्याचे नवीन दर..
अद्याप तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर त्वरित लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन या योजनेसाठी अर्ज करावा. या योजनेची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे राज्यातील सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
4 thoughts on “खुशखबर! 15 ऑगस्टला या महिलांच्या खात्यावर लाडक्या बहिणी योजनेचे 3,000 रुपये जमा, लगेच यादी तुमचे नाव तपासा”