Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात वातावरण बदलले, पुन्हा एकदा पावसाची शक्यता?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update | राज्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. आधी परतीच्या मान्सून निघायची तयारी दाखवली, पण तो पुन्हा एकदा थांबलेला दिसतोय. कारण अरबी समुद्रात उठलेलं शक्ती चक्रीवादळ सगळं समीकरण बदलतय. राज्याला या वादळाचा थेट धोका नसला तरी त्याच्या वाऱ्याच्या दिशेने वातावरणात बदल घडवला आहे. यामुळे पुढचे काही दिवस महाराष्ट्रात काही ठिकाणी पुन्हा पाऊस दिसणार असल्याच हवामान खात्यांना सांगितल आहे. Maharashtra Weather Update

राज्यातील कोकण किनारपट्टी, मुंबई, पालघर, ठाणे आणि पूर्व विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. काही ठिकाणी तर विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. तसेच मराठवाडा आणि उत्तर कोकणात देखील येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व पार्श्वभूमी वरती वाऱ्यांचा वेग ३० ते ४० किमी पर्यंत जाऊ शकतो असं सांगितलं जात आहे. तर काही ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा ऑक्टोबर सायंकाळी शक्तिवादळाने अरबी समुद्रात जोर पकडला. ओमानच्या मासीरा, किनाऱ्यापासून जवळपास 180 किमी आग्नेयस, तर पाकिस्तानच्या कराची पासून 930 किमी नैऋत्येस हे वादळ घोवत होतं. पण आता ते पश्चिमेकडे सरकत असून सात ऑक्टोबर पर्यंत कमी दाबाचा पट्टा रूपांतर होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

या वादळाचा थेर परिणाम महाराष्ट्रावरती नसेल, पण त्यातून निर्माण होणाऱ्या वाऱ्यांमुळे आणि बदललेल्या दिशांमुळे हवामानात हलकासा कलटनीचा बदल जाणवेल. तर कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाट सह पाऊस पाण्याची चिन्हे आहेत. काही ठिकाणी शेतकरी कामात असतील तर खबरदारी घेणे आवश्यक आहे.

मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये सध्या सोयाबीन, कपाशी आणि इतर पिके पूर्णपणे वाहून गेले आहेत. त्यामुळे या पावसाच्या सरी काही ठिकाणी वरदान ठरतील, तर काही ठिकाणी अडचणी निर्माण करू शकतात. त्यामुळे पुढचे दोन दिवस हवामानाकडे नीट लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

हे पण वाचा | महाराष्ट्रावर पुन्हा ‘शक्ती’ चक्र वादळाचा धोका? MID ने दिली मोठी अपडेट

Leave a Comment

error: Content is protected !!