Maharashtra Weather Update | विदर्भातील या जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आलेले आहे. पुन्हा एकदा राज्यात पावसाचे वातावरण तयार झाल असून हवामान विभागाने राज्यातील अनेक भागासाठी एक विशेष अलर्ट जारी केलेला आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. यामुळे या हवामान बदलाचे अपडेट हवामान खात्याने दिलेली असूनही शेतकऱ्यांना माहीत असणे आवश्यक आहे त्यासाठी हा लेख सविस्तरपणे वाचा. (Maharashtra Weather Update)

हवामान विभागाने विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे हवामान खात्याच्या लक्षाकडे विदर्भातील शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं आहे. या हवामान अंदाज मध्ये विदर्भात येत्या तीन ते चार दिवसात मुसळधार पावसाचे वातावरण राहील तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील थोड फार पावसाचे प्रमाण वाढेल असे देखील आहे परंतु कुठेही मुसळधार पावसाची शक्यता नाही.

तर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यात पावसाचा जोर वाढेल अशी संकेत हवामान खात्याने दिलेले आहेत. यामुळे ऑगस्ट महिना शेतकऱ्यांसोबत येणाऱ्या पिकांच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा ठरणार आहे.

मुंबई, आणि, पालघर व रायगड या जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता देखील हवामाना खात्याने आज वर्तवली आहे.

यामध्ये कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घ्यायचा आहे.

पुण्यामध्ये देखील आज ढगाळ वातावरण राहील, तर उर्वरित पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जसं की, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे. घाटमाथ्यांवर विशेष पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

मराठवाड्या बाबत बोलायचे झाल्यास मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव मध्ये विजांचा कडकडाटात आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर मध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर हवामान खात्याने नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज विशेष लक्ष घ्यावा. तर अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अशाच हवामाना अपडेट साठी आम्हाला फॉलो करा.

Leave a Comment