Maharashtra Weather Forecast : राज्याच्या हवामान सातत्याने बदल होत आहे. या बदलामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. हिवाळ्याचा ऋतू देशभरातील बहुतांश राज्यावर पकड घट्ट करतो त्याच काळात यंदाच्या वर्षी मात्र एक वेगळे चित्र पाहिला मिळत आहे.
सध्याच्या घडीला महाराष्ट्र मध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असून, त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. ज्यामुळे होती नव्हती ती थंडी सुद्धा आता कमी झाली आहे. पावसाळी ढगांचा सवाट मुंबईपासून, नवी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड पट्ट्यावर पहिला मिळणार आहे.
हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गुजरातच्या किनारपट्टी पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. तर पश्चिम मध्ये एक थंड हवेचा प्रवाह हरीणामध्ये सक्रिय आहे. परिणामी आग्नेय कडून बाष्पयुक्त वारे राज्यांमध्ये येत असल्यामुळे हे पावसाळी वातावरण तयार झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ज्यामुळे पुढील 48 तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र विदर्भामध्ये थंडी वाढेल. तर मध्य महाराष्ट्र कोकणपट्ट्याला पावसाचा तडाका बसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
मागील दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तापमानाची काही अंश वाढ नोंदवण्यात आलेली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर इथे पावसाच्या जोरदार हजेरी पाहायला मिळाली आहे. सोसाट्याचा वारा आणि पावसाचा मारा यामुळे रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर, चिपळूण भागामध्ये पावसाचा तडाका बसला आहे. आणि भागांमध्ये काजू-आंबा सुपारी आणि नारळाच्या बागांना हि मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा फटका बसला आहे.