Maharashtra Silai Machine Scheme : राज्यातील महिलांना लाभ देण्यासाठी सरकार अनेक योजना राबवते. त्या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक लाभ व व्यवसाय करण्यासाठी काही साधनांची उपलब्ध करून देते. मध्यंतरी जुलै महिन्यामध्ये शिंदे फडवणीस पवार सरकारमध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली. या योजनेअंतर्गत महिलांना एक हजार पाचशे रुपयांच्या आर्थिक मदत देण्यात येते. अशीच काही योजना सरकारने राबवली आहे ही योजना देशातील गरीब व गरजू महिलांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या योजनेमुळे महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना आर्थिक शौर्यप्रदान करणे सोपे होणार आहे. महाराष्ट्रातील महिलांना या योजनेमध्ये कशाप्रकारे अर्ज करायचा वही योजना काय काम करते हे आपण जाणून घेणार आहोत. Maharashtra Silai Machine Scheme
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे. त्यासोबत प्रशिक्षण देऊन त्यांच्या कौशल्याचा विकास केला जाणार आहे. त्याच्या योजनेमध्ये तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता त्यासाठी कागदपत्रे व योजनेची सविस्तर माहिती खालील प्रकारे जाणून घ्या.
मोफत शिलाई मशीन योजना पात्रता (Beneficiary Eligibility)
या योजनेचे नाव पीएम शिलाई मशीन योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीन देण्यात येणार आहे त्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्रे देखील असणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही खालील दिलेल्या निमात बसत असाल तरच अर्ज करू शकता.
- लाभार्थी : या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात त्यांचे वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
- अर्जदार महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे काही राज्यांमध्ये यासाठी वेगवेगळे सीमा असू शकते.
- या योजनेमध्ये शिक्षणाची कुठलीही अट नाही तसेच सरकारी नोकरदार किंवा राजकीय पद भूषवणाऱ्या कुटुंबातील महिला या योजनेत पात्र ठरणार नाहीत.
मोफत शिलाई मशीन साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required documents)
- आधार कार्ड
- निवास प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा पुरावा
- बँक खाते तपशील
- पासवर्ड आकाराचे फोटो
- अपंग असल्यास अपंगत्वाचा प्रमाणपत्र
यांना मिळणार अनेक फायदे
योजनेअंतर्गत सरकारकडून काही फायदे दिले जात आहेत. महिलांना शिलाई मशीन खरेदीसाठी 15000 रुपये दिले जातात. तसे दोन लाख रुपये पर्यंत व्याजमुक्त कर्जही दिली जाते. महिलांना शिवकाम डिझाईनिंग आणि टेलरिंग सारखी कौशल्य शिकवण्याची मोफत प्रशिक्षण देखील पुरवले जाते.
आवेदन प्रक्रिया
- सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर तिथे गेल्यानंतर तुम्हाला नोंदणी फॉर्मवर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमच्या सोबतचे कागदपत्रे समजा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक भरून रजिस्ट्रेशन करा.
- त्यानंतर आवश्यक ती माहिती व्यवस्थित प्रमाणे भरा आणि फॉर्म सबमिट करा
योजनेचे उद्दिष्ट : ही योजना महिलांना घरून स्वावलंबी व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी एक उत्तम संदीप प्रदान करते. त्यामुळे महिलांना रोजगार मिळण्यास मदत होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल.