Maharashtra Rain Update | महाराष्ट्र वरती सध्या अजून पावसाचे संकट कायम आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थितीमुळे अनेकांचे घर उध्वस्त झालेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस जणू आभाळ फाटल्यासारखा पडत आहे. शेतात पाणी घरामध्ये पाणी सारा संसार वाहून गेला, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पीक राहिला नाही कसं खावं? कसं जगाव? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जगाला जगवणारा शेतकरीच आज रस्त्यावरती आलेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये आता अश्रू आलेले आहेत. इतक्या मोठ्या संकटांने राज्याला पुन्हा एकदा पुराची झळ बसली आहे. Maharashtra Rain Update
अशातच भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा मोठ्या इशारा दिला. पुढील 25 तासात महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे. उत्तर कोकण सह घाटमाथ्यांवर ऑरेंज अलर्ट, तर मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे या भागात अतिवृष्टीची शक्यता असल्याने प्रशासन हाय अलर्ट वर आल आहे. तर धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
काल रात्री मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाचा फटका बसलेला आहे अनेक भागात रस्ते जलमय झाले, गाड्या बंद पडल्या, तर सामान्य माणसाचं घराबाहेर पडणं देखील अवघड झाल आहे. सध्या रिमझिम पाऊस सुरू असला तरी हवामान विभागांना दिलेल्या इशारान लोकांची चिंता अधिकच वाढली आहे.
ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांचे जगन असलेलं खरीप पिकच पाण्यात बुडाल आहे. जालना जिल्ह्यात जाफराबाद तालुक्यातील उसाचे तब्बल 90 एकर क्षेत्रावरील पीक जमीन दोस्त झालं. देवळेगव्हाण परिसरात 12-13 शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहिलेलं नाही. उसाचं आडवं झालेलं पीक बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल आहे. मेहनतीने उभं केलेली शेती काही तासाच्या पावसाने पूर्णपणे उद्ध्वस्त केली.
प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. पंचनामे होत आहेत, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवल जात आहे. मात्र लोकांच्या मनात भीतीच सावट आहे. कारण हा पाऊस अजूनही थांबण्याच नाव घेत नाही. पुढील 25 तासात नागरिकांसाठी विशेष खबरदारी घ्यावी अनावश्यक घराबाहेर पडू नये असा स्पष्ट करा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे.
हे पण वाचा | अवकाळी पाऊस अजून गेलेला नाही, राज्यात ‘या’ तारखेपर्यंत बरसणार जोराचा पाऊस, पंजाबरावांचा नवीन अंदाजकाय काय म्हणतोय?