Maharashtra rain alert | महाराष्ट्र मध्ये सध्या मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरले तर पूर्ण पीक पाण्याखाली गेलेले आहे. अशातच पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याचा अंदाज शेतकऱ्यांना धडकी भरवणार आहे. आत्ताच आलेल्या ताज्या अपडेट नुसार राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रामध्ये परतीला निघालेल्या मान्सूनमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणखी जोर वाढत आहे. राज्यामध्ये पुढील दोन ते तीन दिवस काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होऊ शकतो तसेच अतिवृष्टीची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाने राज्यातील काही 11 जिल्ह्यांना थेट रेड अलर्ट दिलेला आहे. Maharashtra rain alert
राज्यामध्ये बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे. राज्यात आज सकाळ धरूनच पावसाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पुन्हा ग्रामीण भागामध्ये जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर येऊ शकतो, यामुळे ग्रामीण भागाचे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
पुढील 24 तासात या जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने शनिवारी म्हणजे आज 27 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील काही भागात तर कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचे देखील आव्हान करण्यात आलेले आहे.
या पार्श्वभूमी वरती राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, रायगड, ठाणे, मुंबई, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्हे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
28 सप्टेंबर रोजी कुठे पाऊस होणार ?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 28 सप्टेंबर म्हणजे रविवारच्या सुट्टी दिवशी हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दोन-तीन जिल्हे सोडता पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
यामध्ये 28 सप्टेंबर रोजी संपूर्ण रायगड जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि ठाणे, पालघर, मुंबई, Ratnagiri, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यात देखील अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
तर 29 सप्टेंबर सोमवार रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यात तर सातारा, पुणे, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. या सर्व पार्श्वभूमी वरती या जिल्ह्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. राज्यात पावसाचे मोठे संकट निर्माण झालेले आहे या पार्श्वभूमी वरती सर्वांनी आपापली काळजी घेणे गरजेचे आहे. हवामान खात्याच्या अंदाज कडे बारकाईने पाहून व्यवस्थित नियोजन करा.
हे पण वाचा | पंजाब डक नवीन हवामान अंदाज : पंजाबराव म्हणतात या तारखेला पडणार अवकाळी पाऊस