Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रातील या भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या हवामानामध्ये बदल झालेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे चांगले टेन्शन वाढवलेले आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे. या हवामान अंदाज मध्ये मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलेला आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर हवामान अंदाज. Maharashtra Rain Alert :

सध्या राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे.

पश्चिम – मध्य बंगालच्या उपसागरात उत्तर तमिळनाडू दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारालगत ठळक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पश्चिमेकडील सरकत असलेली ही प्रणाली हळूहळू निवळण्याची शक्यता आहे. पश्चिम चक्रवात, राजस्थान आणि परिसरावर असलेल्य चक्रकार वारे तसेच अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरातून होणाऱ्या बाष्पाच्या पुरवठ्या मुळे महाराष्ट्रात सह उत्तर भारतात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.

या जिल्ह्यांना इशारा

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे या भागाचे शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन त्यांच्या शेती पिकांचे व्यवस्थित प्रकारे नियोजन करायचे आहे. यामुळे त्यांना नुकसानी पासून वाचवण्यास मदत होणार आहे. या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे चांगले टेन्शन वाढविले आहे.

Leave a Comment